पोलीस दलात उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल दिले जाणारे पोलीस पदक, पोलीस शॉर्य पदक जाहीर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 30, 2021

पोलीस दलात उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल दिले जाणारे पोलीस पदक, पोलीस शॉर्य पदक जाहीर

पोलीस दलात उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल दिले जाणारे पोलीस  पदक, पोलीस शॉर्य पदक जाहीर                                                                                   पुणे : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आज राज्यातील पोलीस दलात उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक,पोलीस पदक व पोलीस शॉर्य पदक जाहीर झाले आहेत. राज्यातील 779 पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांना यंदा पदक मिळाले आहे.महाराष्ट्र ,पुणे शहर पोलीस दलातील सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक मिळाले आहे. परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल तसेच गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांना सेवेत सतत 15 वर्ष उत्तम
सेवाअभिलेख यांना मिळाले आहे. तर पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांना विशेष शाखेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल पदक मिळाले आहे. पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड यांना
दरोडा व गुन्हेगाऱ्यांच्या टोळ्यांवर केलेल्या
कारवाईमुळे पदक झाले आहे. उपनिरीक्षक
अरविंद चव्हाण, शिवदास गायकवाड, सहाय्यक
उपनिरीक्षक प्रल्हाद भोसले, शिवाजी शेळके,
राजेंद्र जगताप, दिलीप काची, दत्तात्रय शेळके
आणि पोलीस हवालदार विजय भोंग, प्रदीप
शितोळे, सुनील शिंदे, राजकुमार बारबोले,
किरण देशमुख, कृष्णा बढे, विजय कदम,
यशवंत खंदारे तर पोलीस नाईक सुरेंद्र जगदाळे,
मनोज जाधव, मंगेश बोऱ्हाडे, दिपक दिवेकर
यांना सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेवाअभिलेख
आणि महिला पोलीस शिपाई हेमलता घोडके
यांना राष्ट्रीय स्थरावर खेळात प्राविण्य
मिळवल्याने पदक मिळाले आहे.पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस निरीक्षक
विलास देशपांडे, अशोक धुमाळ, प्रताप मानकर
तसेच सहाय्यक उपनिरीक्षक शब्बीर पठाण
आणि पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर यांना
सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेवाअभिलेख तसेच
पोलीस शिपाई सुलतान डांगे यांना राष्ट्रीय
स्थरावर खेळात प्राविण्य मिळवल्याने पदक
मिळाले आहे.लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस उपनिरीक्षक (सध्या एक टप्पा सहाय्यक निरीक्षक) गिरीश सोनवणे यांना सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेवाअभिलेख आणि यतीन संकपाळ यांना विशेष शाखेत उत्तम कामगिरी यासाठी पदक जाहीर झाले आहे.

No comments:

Post a Comment