अनुष्का गवळीची राष्ट्रिय पेंचाक सीलाट स्पर्धेत सोनेरी भरारी
बारामती:20 ते 31 मार्च दरम्यान जम्मू काश्मीर या ठिकाणी सम्पन्न झालेल्या 9व्या राष्ट्रीय पेंचाक सीलाट स्पर्धेत महाराष्ट्राच्या(बारामती) अनुष्का सचिन गवळी हिने पहिल्याच प्रयत्नात नेत्रदीप कामगिरी करत महाराष्ट्राला गोल्ड मेडल मिळून देऊन बारामतीच्या शिरपेचात मनाचा तुरा घेतला, आपल्या नेत्रदीप कामगिरीने अनुष्काने अनेकांना धुरळ चारत आपल्या यशाचा पाठलाग केला, पोलो ग्राउंड पोलो स्टेडियम श्रीनगर या ठिकाणी झालेल्या 9व्या राष्ट्रीय पेंचाक सीलाट स्पर्धेत अनुष्का सुब-ज्युनियर गटात यश मिळवून दिले, अनुष्काने तुंगल हा इव्हेंट महाराष्ट्रकडून प्रदर्शीत केला , तिला मध्यप्रदेश,कर्नाटक,पंज्याब,मणिपूर, जम्मूकाश्मीर या 5 राज्यांना कडवी झुंज द्यावी लागली. मनात ओलम्पिकचे स्वप्न, व तीव्र इच्छाशक्ती मुळे आपल्या महाराष्ट्राचे नाव भारतात गाजवले व महाराष्ट्राला गोल्ड मेडल मिळवून दिले.
अनुष्का ला पेंचाक सीलात फेडरेशन इंडियाचे अध्यक्ष श्री. किशोर येवले सर व मुहंमद इकबाल सर यांनी मेडल देऊन सन्मान केला अनुष्का बारामतीच्या योद्धा स्पोर्ट्स अकादमीत पेंचाक सीलाट या खेळाचे आंतराष्ट्रीय कोच व रेफरी साहेबराव ओहोळ यांच्याकडून प्रशिक्षण गेली 4 वर्ष घेत आहेत. ती विद्याप्रतिष्ठान स्कुल ला असून तिची ऑलम्पिक मेडल बारामतीला(भारताला) मिळून देण्याची तीव्र इच्छा आहे तिने मिळालेल्या यशाचे श्रेय आपल्या गुरूंना , आई-वडील यांना व नातलगांना दिले आहे
No comments:
Post a Comment