सातव कुटुंबीयांनी सुरू केले १०० बेड क्षमतेचे कोविड हॉस्पिटल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 28, 2021

सातव कुटुंबीयांनी सुरू केले १०० बेड क्षमतेचे कोविड हॉस्पिटल

सातव कुटुंबीयांनी सुरू केले १०० बेड क्षमतेचे कोविड हॉस्पिटल 
बारामती :महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना  बारामती शहरात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, अनेक रुग्णांना बेड मिळत नसल्याने वेळेवर उपचार मिळत नसल्याचे वास्तव आहे. या पार्श्भूमीवर
धों. आ. सातव कारभारी हायस्कूल कसबा येथे पाच दिवसांत १०० बेड क्षमतेचे कोविड हाँस्पिटल सुरू करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण' उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने बुधवारी (दि.२८) करण्यात आले आहे.बारामतीकरांना सेवा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा
यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीतील सातव कुटुंबीयांच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड व डॉ. सुनील पवार यांच्या
अंतर्गत १०० बेड क्षमतेचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे.कसबा येथील धों. आ. सातव हायस्कूलमध्ये सर्व शासकीय
परवानगी घेऊन कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. मागील काही दिवसांतकरोना रुग्णांची संख्या वाढत असून,अनेक रुग्णांना बेड मिळत नसल्याने नातेवाइकांची धावपळ होत असल्याचे लक्षात आल्यावर डॉ. सुनील पवार
यांच्या येथील सातव कुटुंबातील माजी
नगराध्यक्ष सदाशिव सातव, गटनेते सचिन सातव, नगरसेवक सूरज सातव,डॉ. सुहासिनी सातव, दि. माळेगाव कारखान्याचे संचालक नितीन सातव
यांनी पुढाकार घेत कोविड हॉस्पिटल सुरू केले. हॉस्पिटलमध्ये ३० ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत, तर व्हेंटिलेटर लावले आहेत. तर औषध व विविध तपासण्यांचा खर्च रुग्णांच्या
नातेवाइकांना करावा लागणार आहे.इतर सर्व सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत.हॉँस्पिटलमध्ये १५ डॉक्टर व नर्सिंग स्टाफ २४ तास असेल.हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी व उपलब्धतेनुसार औषधांची सुविधा दिली आहे. तर २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा,डॉक्टर, सिद्हिल सर्जन, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचे सहकार्य लाभले.या वेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील,
नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, सभापती नीता फरांदे, उपसभापती रोहित कोकरे, गटनेते पंचायत समिती प्रदीप धापटे, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे,
उपविभागीय पोलीस अधीक्षक नारायण शिरणावकर, डॉ. अशोक तांबे,वसंत गावडे चेअरमन मार्केट कमिटी,अध्यक्ष खरेदी-विक्री संघ शिवाजी टैंगले, बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, अनिल तावरे, सुरेश
खलाटे, स्वप्निल जगताप आदींसह डॉक्टर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment