खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

बारामती:-मे. अति. जिल्हा व सत्र न्यायाधिश, आर. आर. राठी सो यांनी आरोपी नामे जुबेर करीम नालबंद, वय वर्षे ३० यांची खुनाचे आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.सविस्तर माहिती अशी की आरोपी जुबेर नालबंद हा त्याची पत्नी हसीना व ७
महिन्याचा मुलगा शाहबाद, सासू रहीमत शेख यांचे सोबत सासरवाडी खडकआळी, पणदरे, ता.
बारामती जि. पुणे येथे राहत होता. आरोपी त्याची पत्नी हसीना हिचे चारित्रावरती संशय घेत असे व म्हणत असे की शाहबाद हा मुलगा माझा नाही. त्या कारणाने पत्नीस दारू पिवून नेहमी त्रास देत असे. दि. २१/७/२०१८ रोजी सायंकाळी ६ वाजणेचे आसपास आरोपी व शाहबाद दोघे घरीच होते. पत्नी हसीना व सासू रहीमत कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने मनात राग धरून मुलगा शाहबाद याचा टॉवेलने गळा दाबून खुन केला व तेथून निघन गेला.हसीना व तिची आई रहिमत घरी आलेनंतर त्यांना मुलगा शाहबादची हालचाल होत नाही हे लक्षात आलेने त्यास डॉ. निलेश शहा यांचे दवाखान्यात घेवून गेले असता त्यास मृत घोषित
करण्यात आले. असा आरोप आरोपीवरती ठेवण्यात आला होता. वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होवून, आरोपीस अटक करण्यात आली. दोषारोपपत्र मे. कोर्टात दाखल होवून सरकार पक्षाचे वतीने एकूण सहा (६) साक्षीदार तपासण्यात आले. आरोचे वतीने अॅड.
विनोद जावळे यांनी कामकाज पाहिले. प्रस्तुत केसमध्ये प्रत्यक्ष दर्शनी साक्षीदार नाही. संपूर्ण केस परिस्थितीजन्य पुराव्यावरती अवलंबून आहे.साक्षीदारांच्या जबाबामध्ये तफावत निर्माण होते.साक्षीदार नं १ हसीना व साक्षीदार नं २ रहीमत सरकार पक्षास सहकार्य करीत नाहीत. वैदयकीय पुरावा निष्पन्न होत नाही. पोलीसांच्या तपासावर संशय निर्माण होतो असे विविध मुद्दयांवरती अॅड. विनोद जावळे यांनी युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद ग्राहय धरत आरोपीची प्रस्तुत केसमधून पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने अॅड. विनोद जावळे,अॅड. गणेश धेंडे , अॅड. जीवन पवार, अॅड. प्रणिता जावळे, अॅड. मोनिका निकाळजे, अॅड.सीमा पवार व अॅड मानसी संजय गायकवाड यांनी कामकाज पाहिले.

No comments:

Post a Comment