कोव्हिड रुग्णालयाच्या भीषण आगीत १३ जणांचा होरपळून रुग्णांचा मृत्यू - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 22, 2021

कोव्हिड रुग्णालयाच्या भीषण आगीत १३ जणांचा होरपळून रुग्णांचा मृत्यू

कोव्हिड रुग्णालयाच्या भीषण आगीत १३ जणांचा होरपळून रुग्णांचा मृत्यू
मुंबई :  नुकताच नाशिकची ऑक्सिजन टाकी गळतीने २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता मुंबई येथील वसईच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे.हॉस्पिटलला लागलेल्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अशी प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे. पालघर जिल्ह्यातील वसईच्या कोविड सेंटरमध्ये ही आग लागली आहे. एसीचा स्फोट झाल्याचे
सांगितले जात आहे. या आगीत १२ ते १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे वसई विरार महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रुमकडून
सांगण्यात आले आहे. विरार पश्चिमेकडे विजय वर्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आज मध्यरात्री ३ ते ३.३० च्या दरम्यान भीषण आग लागली.यावेळी आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास १७ रुग्ण उपचार घेत होते. यातील १३ जणांचा
होरपळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
वर्तवला जात आहे.अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून पोलिसांकडून याठिकाणी मदतकार्य करण्यात आले. शिवाय रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्यासाठीही युद्धपातळीवर हालचाली करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment