होलार समाजाच्या वतीने पाचशे गरजू कुटुंबीयांना साखर वाटप - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 28, 2021

होलार समाजाच्या वतीने पाचशे गरजू कुटुंबीयांना साखर वाटप

*होलार समाजाच्या वतीने पाचशे गरजू कुटुंबीयांना साखर वाटप*

लॉकडाऊनच्या काळात होलार समाजाने केला मदतीचा हात...

बारामतीत होलार समाजाच्या वतीने एक हात मदतीचा ..




बारामती (दि:२८)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शिखर शिंगणापूरची यात्रा रद्द करून होलार समाजाच्या वतीने एक हात मदतीचा म्हणून बारामतीतील ५०० गोरगरीब कुटुंबांना घरोघरी जाऊन साखर वाटप करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या हस्ते कीट वाटप करण्यात आले. यावेळी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन देखील करण्यात आले. या प्रसंगी बळवंत माने, बाळासाहेब देवकाते, नगरसेवक कुंदन लालबिगे बाळासाहेब जाधव,भारत देवकाते, पत्रकार सूरज देवकाते, सेवक अहिवळे , निवृत्ती गोरे ,पंडित गुळवे उपस्थित होते.

 
बारामती होलार समाजाच्या वतीने दरवर्षी शिखर-शिंगणापूर येथे यात्रेनिमित्त समाजाच्या वतीने कावडीतील सर्व शिवभक्तांसाठी दर वर्षी महाप्रसाद तसेच अन्नदानाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते. मात्र यंदा देखील देशामध्ये कोरोनाच सावड व सर्व ठिकाणी संचारबंदी ,लॉकडाऊन असल्यामुळे  हातावरचे पोट असणाऱ्या मजुरांची दयनीय
अवस्था होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीतील होलार समाजाच्या वतीने गोरगरीब गरजू नागरिकांना साखर वाटप करण्याचा निर्णय समाजाच्या वतीने घेण्यात आला . तसेच गेल्या वर्षी देखील कोरोनाचे सावट असल्याने यात्रा रद्द करून जवळपास चारशे पेक्षा जास्त गोरगरीब कुटूंबियांना समाजाच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले होते. आणि या वर्षी देखील समाजाने एक हात मदतीसाठी पुढे करत पाचशे कुटुंबीयांना साखर वाटप केले आहे. दरम्यान या सामाजिक कार्याचे कौतुक संपूर्ण बारामतीत होत आहे.

यावेळी सदाशिव गुळवे , ईश्वर पारसे, अर्जुन चौगुले , महादेव जाधव, गोरख पारसे, नितीन अहिवळे यांनी मोठे परिश्रम घेतले.


*चौकट* :-
____________________

"बारामतीत कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे त्यातच संचारबंदी ,लॉकडाऊन असल्यामुळे  हातावरचे पोट असणाऱ्या मजुरांची दयनीय
अवस्था होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर एक छोटीशी मदत म्हणून होलार समाजाच्या वतीने शिखर शिंगणापूर यात्रा रद्द करून  ५०० गोरगरीब गरजू नागरिकांना साखर वाटप करण्याचा निर्णय समाजाच्या वतीने घेण्यात आला. यावेळी शासकीय नियमांचे पालन करत घरोघरी जाऊन साखर वाटप करण्यात आली"*

   

No comments:

Post a Comment