गीते वैभव: जनतेचा प्रामाणिक विश्वासू चेहरा वैभवजी गिते - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

गीते वैभव: जनतेचा प्रामाणिक विश्वासू चेहरा वैभवजी गिते

गीते वैभव: जनतेचा प्रामाणिक विश्वासू चेहरा वैभवजी गिते


पुणे:-वैभव तानाजी गिते हे राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन या संघटनेचे राज्याचे सचिव म्हणून काम पाहत आहेत. राज्यात ॲट्रॉसिटी कायदा तज्ञ कार्यकर्ता व व्याख्याता म्हणून वैभव गीतेंची घराघरांमध्ये ओळख आहे. अनेक शासन निर्णय,परिपत्रके दिनांकासह तोंडपाठ असणारा आंबेडकरी चळवळीतील आक्रमक प्रामाणिक लढवय्या नेता म्हणून वैभव गीतेंचा नावलौकिक आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात परिवर्तनवादी चळवळीतील नेत्यांची आदरयुक्त पओळख असणारा तरुण कार्यकर्ता म्हणूनसुद्धा वैभव गितेंचे नाव आदराने घेतले पजाते.ऍड.डॉ.केवलजी उके साहेबांच्या सारख्या कायदा पतज्ञांचे सखोल मार्गदर्शन आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते  विकास दादा धाइंजे यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्यांची भर तारुन्यापासूनच सोबत लाभल्याने आयुष्याला कलाटणी मिळाली असे वैभव गिते कित्येकदा निसंकोचपणे सांगतात.ज्यांच्या बोटाला धरून शिकलो त्यांच्याप्रती आजन्म आज्ञाधारक बनून अचूक ध्येय गाठेन असे अनेकवेळा सभांमध्ये बोलतात त्यांच्या भाषणांमध्ये शिव,फुले,शाहू,आंबेडकरी विचारधारेची आक्रमकता,अचूकता,पारदर्शकता,सत्यस्थिती व सद्यस्थिती नवीन जुन्या उदाहरनासह अफलातून मंडण्याचे कौशल्य असल्याने जनता तासंतास वैभव गीतेंचे विचार ऐकायला बसते.
पीडित कुटुंबास दिलेले आश्वासन आणि शब्द खरा करण्यासाठी प्राण पणाला लावणारा नेता म्हणून तरुणांमध्ये क्रेज व चर्चा असणारा नेता म्हणजे वैभव गिते होय!
चळवळीतील कार्यकर्ता जगला पाहिजे स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे म्हणून महाराष्ट्रातील एकमेव बोलके उदाहरण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात वैभव गिते व विकास धाइंजे या गुरूशिष्याच्या जोडीने साडेतीन लाखाचा एक असे 157 मिनी ट्रॅक्टर वेगवेगळ्या जाती-धर्माच्या बचतगटांना मिळवुन दिले आहेत.जिल्ह्यात अनेक जाती-धर्माच्या नागरिकांच्या घरकुलांना हक्काची शासकीय जागा मिळवून दिली.सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी वैभव गीतेंच्या कामाचा आवाका आणि तळमळ पाहून सोलापूर जिल्ह्याच्या महत्वाच्या अश्या म्यान्यूअल स्कॅवेंजिंग कमिटी वर विद्यमान सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.पहिल्याच बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले.अशी अनेक रचनात्मक कामे सांगता येईल.आंबेडकरी चळवळीतील अनेक प्राध्यापक, विचारवंत,लेखक,वकील,शिक्षक,गायक,शाहीर वैभव गीतेंवर अतोनात प्रेम करतात.एवढ्या कमी वयात महाराष्ट्रभर फिरून जनतेचे प्रश्न सोडवणारा गावपातळीपासून ते राष्ट्रीय प्रश्नांची उकल असणारा जिल्ह्यात,मंत्रालयात,व केंद्रीय शास्त्रीभवन येथे कामाचा व नावाचा दबदबा असलेला नेता म्हणजे वैभव गिते होय

गीते वैभव: ■ कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याची अलौकिक ताकत म्हणजे वैभव गिते ...ऍड.डॉ.केवल उके

■ सोने हिरे व मोत्यापेक्षा मौल्यवान सामाजिक काम करणारा अष्टपैलू सामाजिक कार्यकर्ता आहे वैभव गिते..प्रवीण मोरे स्वीय सहाय्यक मा.मंत्री रामदास आठवले,सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार,

■ उभरत्या तरुण कार्यकर्त्यास संपूर्ण पाठबळ दिल्यास तो काय करून दाखवू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैभव गिते...विकास दादा धाइंजे (माजी सरपंच माळशिरस)

■बदलत्या जीवनशैलीत प्रामाणिक कार्यकर्त्यांना एका माळेमध्ये गुंफण्याचे काम वैभवजी गीतेंना लीलया जमते...संपादक लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनल

◆ न्याय हा मागून मिळत नसतो त्यासाठी संघर्ष करावा लागतो  त्यातून तमाम  पीडितांना न्याय मिळून देणारा  समतादूत सामजिक जीवनातील परीस  ज्याला  सहवास मिळेल त्याच सोन करणार सुवर्ण व्यक्तिमत्त्व  वैभव गीते  आहेत ..अँड अमोल सोनवणे ( बारामती)

■ समाजाने स्वाभिमान बाळगावा असे समाजमान्य नेतृत्व वैभव गिते...ऍड.सुमित सावंत 

■ प्रामाणिक स्वाभिमानी हे शब्द खरे वाटतात वैभव गीतेंच्या कडे पाहिल्यावर...चर्मकार नेते आजीनाथ राऊत

■ राजकारणात जाऊन हवे ते पद घेऊ शकणारा पण आंबेडकरी चळवळीशी प्रामाणिक राहून सामाजिक काम करीत राहणारा समंजस नेता म्हणजे वैभव गिते होय..रमाताई आहिरे

■ समाजकारण व राजकारणात  मोठा नेता असला तरी घरात मोठ्या भावाला वडिलांचा दर्जा देऊन मोठ्या भावाच्यापुढे अगदी नम्र राहून भावाचा आदर करून कुटुंब एकत्र ठेवणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात पेटून उठणारा नेता व माझा जिवलग मित्र आयु. वैभव गिते आहे......आयु. प्रवीण नलावडे सर (वाडिया कॉलेज, पुणे)

■महाविद्यालयीन जीवणापासुनच मैत्री या शब्दाला जागणारा जिवलग मित्र आहे वैभव....डॉ.अमोल सावंत

■ कोणत्याही संकटात परिस्थितीवर स्वार होऊन विजय मिळवायच्या सवयीचा वैभव माझा मित्र असल्याचा मला अभिमान आहे...भारत गायकवाड

■ राज्यात अन्याय अत्याचार झाल्यावर अस्वस्थ होणारा अन्यायाविरुद्ध लढून न्याय खेचून आणणारा एकमेव नेता वैभव गिते होय....संजय नारायण झेंडे

■ वैभव तुझ्यासारखा लढवय्या नेता तयार झाला हीच आमची श्रीमंती.... जेष्ठ नेते पी.एस.गायकवाड

■ हालाखीच्या परिस्थितीत राहणारा पण प्रस्थापितांना शरण न जाणारा आंबेडकरी विचारांचा ज्वालामुखी... निवृत्ती (तात्या) रोकडे.

■ ज्यांच्या बोटाला धरून चळवळ शिकलो त्यांचा आदर,सन्मान कसा करावा याचे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण.... पंचशीला कुंभारकर

■ माझ्या थोरल्या भावाच्या खुणानंतर मला शासकीय नोकरी लावून माझ्या कुटुंबाचे पुनर्वसन करणारा नेता वैभवजी गिते आहेत.

■ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची रिंगटोन वाजली म्हणून मोठ्या भावाची हत्या झाल्यावर मला शासकीय नोकरी लावून आमची उपासमार थांबवणारे सामाजिक कार्यकर्ते वैभव गिते हे आहेत.

■ नितीन आगेची हत्या झाल्यावर  हजारो आले आणि आश्वासने देऊन गेले फक्त एकमेव वैभव गिते आहेत त्यांनी माझ्या मुलीला शासकीय नोकरी लावली व माझे पुनर्वसन केले.... राजू आगे (खर्डा अहमदनगर)

■ सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन समान न्याय करणारा राजा आहे वैभव गिते..मातंग समाजाचे नेते धनाजी शिवपालक

■ होलार समाजावर अन्याय झाल्यावर मोठ्या ताकतीने पाठीशी उभे राहणारे नेतृत्व म्हणजे वैभव गिते होय...संजय गेजगे होलार समाजाचे नेते

No comments:

Post a Comment