प्रशासकीय भवन मधील अधिकारी नक्की करतात तरी काय?म्हणे इथे कोणी तक्रारी करायच्या नाय!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 29, 2021

प्रशासकीय भवन मधील अधिकारी नक्की करतात तरी काय?म्हणे इथे कोणी तक्रारी करायच्या नाय!!

प्रशासकीय भवन मधील अधिकारी नक्की करतात तरी काय?म्हणे इथे कोणी तक्रारी करायच्या नाय!!                                                                                                                 बारामती:-बारामती हे देशाच्या नकाशावर गाजत आहे ,म्हणे बारामती मध्ये जे काय घडेल ते दिल्लीपर्यंत कळते ते ही खरं आहे, आदरणीय पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, खासदार सुप्रियाताई सुळे यांचा मतदार संघ  या मतदार संघात विकास कामे खूप झाली मोठं मोठी इमारती दिमाखात उभी राह्यली, मोठमोठे जिल्ह्यात नसतील असे ऑफिस, फर्निचर बनविले,नागरिकांना सुविधा मिळाव्यात म्हणून एकाच छत्र छायेखाली प्रशासकीय भवन दिमाखात कोट्यवधी रुपये खर्च करून उभं राहिलं बारामतीच्या विकासात मोठी भर पडली यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा मोठा निधी उपलब्ध करतात मग असे असताना दादा आपण केलेल्या मेहनतीवर पाणी पडतंय हे लक्षात केव्हा येईल हे कळेना, कारण भली मोठी इमारत उभा करून प्रशस्त ऑफिस असून देखील काही अधिकारी वर्ग का बसत नाही  दिवसातले ठराविक वेळेस उपस्थित असतात तर बाकीचा वेळ हा साईटवर गेलेत, पंचनामा करायला गेलेत, पुण्याच्या मिटींगला गेलेत,विझिट द्यायला गेलेत हे उत्तर कायम ऐकावयास येथे ही आज नाही तर जशी इमारत उभी झाली तसे हे उत्तर  ऐकावयास येत असल्याचे या बेशिस्त प्रकियेवर नाराज झालेल्या नागरिकांनी बोलून दाखविले आहे,तर काही अधिकारी चांगले काम करतात त्यांच्याकडे तक्रारी केल्या की ते खाली काम करणाऱ्या विभाग प्रमुख असेल अथवा विविध खात्याचे जबाबदार अधिकारी असेल ते सांगितलेल्या कामाकडे बेदखल करतात अश्या कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्यांवर काय कारवाई केली जाते हे अजून नागरिकांना समजले नाही कारण अशी कधी कारवाई झालीच नाही की केली नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग असो, महसूल विभाग असो, वनविभाग असो, उत्पादन शुल्क विभाग असो असे अनेक विभाग आहे की तिथे काही अधिकारी, कर्मचारी कर्तव्यात हलगर्जी पणा करताना दिसून येत आहे याबाबत विभागावर  सविस्तर  पुराव्यानिशी लवकरच प्रसिद्ध करणार आहेत पण आदरणीय अजितदादा आपण याकडे आवर्जून लक्ष द्यावेत कारण यांना लाखो रुपये महसूल नको आहे, चुकीची कामे झाली तर संबंधित ठेकेदार याच्यावर कारवाई नको आहे, अवैद्य दारू विक्रीवर कारवाई करायला इच्छा दिसून येत नाही,अवैध वाळू, मुरूम उत्खनन होत असताना लाखो रुपये महसूल बुडत आहे ते वसूल करायला नको वाटते, रेशनिंग चा काळा बाजार चालू असून त्या दुकानाची तपासणी करायला नको वाटते असे अनेक विषय आहे पण ते मांडणारच आहे, सद्या लॉकडाऊन असल्याने इथे 15 टक्के कर्मचारी उपस्थिती सांगितली जातेय पण काही विभागात तर एक नाही तर दोनच कर्मचारी असतात आणि दुसरीकडे अथवा जुन्या कार्यालयात ठेकेदाराची गर्दी असते अधिकारी कोरोनाचे कारण पुढे करतात नवीन इमारतीत गर्दी करू नका म्हणतात मग दिलेल्या तक्रारीची दखल का घेत नाही की घ्यायची नाही,की ठेकेदाराला पाठीशी घालतात हेच समजत नाही अश्या किती नागरिकांनी तक्रारी केल्या त्याची त्वरित दखल घेतली गेली याला कोणी विचारणारा आहे की नाही असे नागरिक बोलत आहे, अश्या बेशिस्त व मनमानी कारभार करणाऱ्या काही अधिकारी,कर्मचारी यांच्यावर अजितदादा काय कारवाई करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे कारण दादा चुकीच्या कामाला कधी पाठीशी घालत नसल्याचे बारामतीकर चांगलेच ओळखुन आहे    *क्रमश:*

No comments:

Post a Comment