डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतिच्या निविदा त्वरित काढा - अजितदादा पवार - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 4, 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतिच्या निविदा त्वरित काढा - अजितदादा पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतिच्या निविदा त्वरित काढा - अजितदादा पवार 

बारामती- आमराई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतिच्या ९६ घरांच्या निविदा त्वरित काढण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी नगर परिषदेला दिले आहेत. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर व नगरसेवक बिरजू मांढरे यांच्या मागणी पत्राप्रमाणे अजित पवार यांनी हे आदेश दिले. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये ९६ कुटुंबे राहत होती. पूर्वीची इमारत १९७६ साली बांधलेली होती व ती मोडकळीस आल्यामुळे तेथे राहणाऱ्या कुटुंबीयांचे जीवन धोक्यामध्ये आले होते. त्यामुळे तेथील नागरिकांचे जळोची येथे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच सदर जागेवर क्रीडांगणाचे आरक्षण होते ते पूर्णपणे उठवले गेले असून त्या ठिकाणी आर. सी. सी. मधील ९६ घरे बांधली जाणार असून त्यातील रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले आहे व नवीन बांधलेली घरे त्याच लाभधारकांना मिळणार आहेत. या आदेशामुळे आंबेडकर वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे व अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment