*पुणे विभागातील 12 लाख 82 हजार 545 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 14 लाख 45 हजार 729 रुग्ण*
पुणे, दि. 19 : पुणे विभागातील 12 लाख 82 हजार 545 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 लाख 45 हजार 729 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 35 हजार 305 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 27 हजार 879 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.93 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 88.71 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 76 हजार 429 रुग्णांपैकी 8 लाख 93 हजार 676 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 67 हजार 296 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 हजार 457 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.58 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.52 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 38 हजार 620 रुग्णांपैकी 1 लाख 13 हजार 840 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 22 हजार 123 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 657 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 36 हजार 803 रुग्णांपैकी 1 लाख 15 हजार 506 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 687 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 610 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 2 हजार 906 रुग्णांपैकी 85 हजार 553 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 337 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 90 हजार 971 रुग्णांपैकी 73 हजार 970 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 862 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 139 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 9 हजार 896 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 741, सातारा जिल्ह्यात 1 हजार 196, सोलापूर जिल्ह्यात 2 हजार 159, सांगली जिल्ह्यात 1 हजार 258, तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 542 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 15 हजार 75 आहे. पुणे जिल्हयामध्ये 7 हजार 358, सातारा जिल्हयामध्ये 2 हजार 479, सोलापूर जिल्हयामध्ये 2 हजार 250, सांगली जिल्हयामध्ये 2 हजार 27 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 961 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 25 लाख 15 हजार 899, सातारा जिल्ह्यामध्ये 6 लाख 85 हजार 623, सोलापूर जिल्हयामध्ये 4 लाख 78 हजार 628, सांगली जिल्हयामध्ये 6 लाख 48 हजार 950 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 11 लाख 21 हजार 303 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 79 लाख 65 हजार 831 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 14 लाख 45 हजार 729 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 18 मे 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
No comments:
Post a Comment