बारामती तालुक्यातील कडक निर्बंध पुढील 7 दिवसांपर्यंत लागू - प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 11, 2021

बारामती तालुक्यातील कडक निर्बंध पुढील 7 दिवसांपर्यंत लागू - प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे

बारामती तालुक्यातील कडक निर्बंध  पुढील 7 दिवसांपर्यंत लागू 
-     प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे
     बारामती दि.11 :- बारामती तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजना व घेण्यात येणा-या निर्णयाबाबतची बैठक आज बैठक सभागृह, प्रशासकीय भवन, बारामती येथे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडली. 
     यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,  तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी राहुल काळभोर, बारामती नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव,  तालुका आरोग्य अधिकारी  डॉ. मनोज खोमणे, पोलीस निरिक्षक बारामती शहर नामदेव शिंदे,  राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष सभाजी होळकर, भाजपा चे तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे,  गटनेते सचिन सातव, व्यापारी असोसिएनचे नरेंद्र गुजराथी, संजय सोमाणी,  विरोधी पक्ष नेते सुनिल सस्ते, म.न.से. चे अध्यक्ष ॲड. सुधीर पाटसकर, एम.आय.डी.सी. चे अध्यक्ष धनंजय जामदार, कॉग्रेसचे ॲड. अशोक इंगुले, शिवसेनेचे ॲड. राजेंद्र काळे, हॉटेल संघटनेचे अध्यक्ष प्रविण अहुजा,  भाजपचे शहर अध्यक्ष सतिश फाळके, नरेंद्र मोता, वैभव बुरूंगले, स्वप्निल मुथा, सनी गालिंदे, ॲड. गिरीष देशपांडे, मधुकर मोरे, बारामती शहरातील व्यापारी व  औद्योगिक वसाहतीमधील प्रतिनिधी उपस्थित होते.
  उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी कोरोना नियंत्रित करण्यासाठी करण्यात     येणा-या विविध उपाययोजनाबाबत सर्व शासकीय यंत्रणाशी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते म्हणाले की, बारामती तालुक्यात 4 मे 2021 रोजी रात्री 12.00 वा. पासून लागू  करण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे. कोरोनाची साखळी तुटने आवश्यक असल्याने पुढील 7 दिवसांसाठी हे कडक निर्बंध असेच लागू राहतील.
  आज झालेल्या बैठकीतील  निर्णयानुसार दिनांक 11 मे ते 18 मे 2021 रोजी रात्री 12 वा. पर्यंत कडक निर्बंध पूर्वीप्रमाणेच लागू राहतील.  बारामती शहरासह तालुक्यातील हॉस्पिटल, दवाखाने व औषध विक्रीची दुकाने वगळून सर्व आस्थापना/दुकाने पुढील 7 दिवस बंद राहतील. फक्त दूध विक्री सकाळी 7 ते 9 पर्यंत सुरू राहील तसेच अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंत घरपोच सेवा चालू राहील,   असे आदेश प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले. 
  सर्व आस्थापनाचे मालक, चालक आणि सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. तरी सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिंस्टसिंग या त्रिसूत्रीचे व शासनाच्या सूचनांचे पालन करावे, नागरिकांनी  विनाकारण बाहेर फिरु नये असे, आवाहनही यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.

No comments:

Post a Comment