छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने उमेश चव्हाण यांचा सत्कार - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 14, 2021

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने उमेश चव्हाण यांचा सत्कार

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने उमेश चव्हाण यांचा सत्कार

पुणे - राज्याच्या कानाकोपऱ्यात कौतुकाचा विषय ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलची निर्मिती करणाऱ्या उमेश चव्हाण यांचा पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटना विश्रांतवाडी विभागाच्या वतीने आज पहाटे सत्कार करण्यात आला. उमेश चव्हाण हे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष असून या संघटनेच्या वतीने रुग्णांचे हक्क आणि अधिकारांची मोठी चळवळ त्यांनी गेल्या काही वर्षात उभी केली आहे. 
         सध्याच्या परिस्थितीत पॉझिटिव्ह रुग्णाला साधा बेड तर नाहीच, ऑक्सिजनचा बेडही मिळत नसताना केवळ ईच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी त्रेपन्न बेडचे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल अवघ्या आठ दिवसात उभे केले. करोडो रुपयांची संपत्ती असणारे आमदार- नगरसेवक यांना हॉस्पिटल उभे करता येऊ शकले नाही, तिथे उमेश चव्हाण यांनी केलेल्या कृतीचे पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाने स्वागत केले. 
    एक सर्वसामान्य व्यक्तीने आपल्या मित्र परिवाराच्या मदतीने तर प्रसंगी आईचे आणि पत्नीचे सोने गहाण ठेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने  दर्जेदार हाँस्पिटल चालु केले. त्यांना अल्पावधीतच पुणे महानगरपालिकेने आक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेडला ही परवानगी दिली असून दररोज रेमडीसॅव्हीअर इंजेक्शनही त्यांना उपलब्ध होत आहेत.

यावेळी लोकमतचे वरिष्ठ व्यवस्थापक नितीन मोहिते म्हणाले की, वृत्तपत्र विक्रेता रोज शेकडो घरात जात असतो. त्यांना जर गरज पडली तर विक्रेता आणि त्याच्या कुटूंबियांनाआपण बेडची उपलब्धता करावी, असे उमेश चव्हाण यांना सांगितले. यावर उमेश चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मोफत उपचारांची माहिती दिली. 
  जिथे खाजगी हॉस्पिटल चालक दिवसाला पंधरा हजार रुपयांचे कोरोनाचे बिल दररोज वसूल करत असताना शिवाजी महाराजांच्या नावाने सुरु केलेल्या आपल्या हॉस्पिटलमध्ये पैसे भरावे लागत नाहीत .रुग्णावर अगदी मोफत उपचार केले जातात. म्हणून पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेने त्यांचा सत्कार केला.  
    यावेळी बोलताना उमेश चव्हाण म्हणाले की, वृत्तपत्र विक्रेता आणि त्यांचे कुटुंबीय तसेच वृत्तपत्र क्षेत्रातील कामगारांना प्राधान्याने कोविड उपचार मोफतच देऊ. 
    यावेळी नितीन मोहिते, प्रमुख विश्वस्त सलीमभाई सय्यद यांनी हॉस्पिटलची पाहणी केली. संघटनेचे उपाध्यक्ष आणि विभगप्रमुख गणेश चव्हाण , विभागप्रमुख सुरज शिंदे तसेच सेंटर वरील विक्रेते यांनी मोलाचे सहकार्य केले. लोकमतचे उपमहाव्यवस्थापक अमित राठोड यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन योगेश भालेराव यांनी केले.

No comments:

Post a Comment