सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत च्या कार्यकर्त्यांच्या पाठ पुराव्यामुळे वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यास आले यश, आरोपी केले अटक - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 1, 2021

सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत च्या कार्यकर्त्यांच्या पाठ पुराव्यामुळे वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यास आले यश, आरोपी केले अटक


 सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत च्या कार्यकर्त्यांच्या पाठ पुराव्यामुळे वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यास आले यश, आरोपी केले अटक      इंदापूर:-  पुणे वन विभागाअंतर्गत वनपरिक्षेत्र इंदापूर मधील पक्षीनिरीक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या भिगवण पासून काही किलोमीटर अंतरावर कळसचे माळरान असून या माळरानावर विविध जीवांचा अधिवास असून सदर ठिकाणी काही स्थानिक अप्रशिक्षित गाईड्स कडून पर्यटकांना छायाचित्रणासाठी आणले जाते सदर ठिकाणी खोकड ( इंडियन फॉक्स) व त्याच्या या पिल्लांचे छायाचित्र काढण्यासाठी वर्दळ असते तथापि खोकड व त्याच्या पिल्लांची काही हौशी छाया चित्रकारांकडून छायाचित्र काढण्याच्या नादात अप्रशिक्षित गाईड्स कडून काही अनुचित प्रकार केले असल्याचे निदर्शनास आले आहे. या वन्य प्राण्याचे पिल्लांचे छायाचित्र मिळावे म्हणून त्यांच्या जमिनीत केलेल्या बिळांसमोर कोंबडीचे मांस टाकण्याचे प्रकार या ठिकाणी केले जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यामुळे श्री. राहुल पाटील भा.व.से. उपवनसंरक्षक, वनविभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राहुल काळे वनपरिक्षेत्र अधिकारी इंदापूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर गैरकृत्य हे आरोपी नामे दत्ता नामदेव कुंडारे व गणेश बापू भोई रा. कुंभारगाव, तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. वरील आरोपींनी वन्यजीवांच्या अधिवासास धोका निर्माण केल्यामुळे आरोपींना अटक केली असून त्यांचे विरुद्ध वन्य जीव( संरक्षण )अधिनियम १९७२ चे कलम २(१६),९,११,५१  तसेच भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१) (डी) (आय) अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींना माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इंदापूर यांचे न्यायालयात हजर केले असून आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे तसेच या गुन्ह्यातील सह आरोपी टूर ऑपरेटर व हौशी वन्य जीव छायाचित्रकार यांचा शोध वनाधिकारी घेत आहेत. सदर कारवाई  राहुल काळे वनपरिक्षेत्र अधिकारी इंदापूर, श्री नरोटे वनपाल जंक्शन वनरक्षक कांबळे, काटे, बागडे व इतर वन कर्मचारी यांनी केली असल्याची माहिती देण्यात आली.

No comments:

Post a Comment