ॲड.बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत १०८ बाटल्या रक्तदान - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 10, 2021

ॲड.बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत १०८ बाटल्या रक्तदान

ॲड.बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत १०८ बाटल्या रक्तदान

बारामती:- ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १०८ बाटल्या रक्तदान करण्यात आले. कोरोनाची गंभीर परस्थिती असताना राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा पडण्याची देखील शक्यता उद्भावली आहे. अश्या परिस्थितीत नालंदा विपश्यन प्रतिष्ठान च्या वतीने सामाजिक सलोखा जपत बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत १० मे रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. कोरोना ची गंभीर परस्थिती असताना आणि तालुक्यात लॉकडाऊन असताना देखील रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. 
       कार्यक्रम सुरू असताना सरकारने सांगितलेल्या कोरोना च्या सर्व नियमांचे पालन करत Social Distance, मास्क, Sanitizer चा वापर करण्याचे वेळोवेळी सांगत पालन करत शिबिर पार पाडण्यात आले. यावेळी गावचे प्रतिष्ठित पुढारी, जागरूक नागरिक तसेच बाळासाहेब आंबेडकरांचे समर्थक आदी उपस्थित होते. बारामती तालुक्यातील निरावागज गावाने रक्तदान शिबिरासारखे उपक्रम घेऊन समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केलेला दिसतो.
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावच्या सरपंच सौ.विद्या दत्तात्रय भोसले, प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री लक्ष्मण तात्या भोसले, सचिव शितल भोसले, कृष्णा भोसले, सुरज भोसले, रोहित भोसले, दत्तात्रय आप्पा भोसले, सचिन भोसले, योगेश भोसले, उमेश भोसले, सुरेश निकाळजे, संतोष भोसले तसेच शिव स्वराज्य प्रतिष्ठान निरावागज   आणि समस्त ग्रामस्थ निरावागज यांच्या वतीने मोलाचे योगदान देण्यात आले. अशी माहिती सम्यक विद्यार्थी आंदोलन बारामती तालुक्याचे अध्यक्ष रोहित भोसले यांनी दिली.

No comments:

Post a Comment