दरोडा टाकणाऱ्या परजिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीविरोधी वडगाव निंबाळकर पोलिसांकडून मोक्का अंतर्गत कारवाई - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 25, 2021

दरोडा टाकणाऱ्या परजिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीविरोधी वडगाव निंबाळकर पोलिसांकडून मोक्का अंतर्गत कारवाई

दरोडा टाकणाऱ्या परजिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीविरोधी वडगाव निंबाळकर पोलिसांकडून  मोक्का अंतर्गत कारवाई
वडगाव निंबाळकर :- पोलिस स्टेशन हद्दीत मौजे सोनकसवाडी ता बारामती जि पुणे येथे दिनांक १६/०२/२०२१ रोजी रात्रौ १२ ते पहाटे २ वा चे सुमारास बंद घराची घरफोडी करून तसेच आणखी एका घरात जाऊन चाकुचा धाक दाखवून दरोडा टाकून घरातील सोने-चांदी चे दागिने व रोख रक्कम असा एकूण २१६०००/- रुपयांचा मुददेमाल दरोडा टाकुन लुटून
नेलेने सदर बाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला दरोडयाचा गुन्हा दाखल झालेला होता.
सदर गुन्हयाचा तपास मा. डॉ.अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण, अण्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते बारामती विभाग बारामती, मा.नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग बारामती, व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक
पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व त्यांच्या पोलीस टीमने सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या
आधारे सदर गुन्ह्यातील १)अजय उर्फ अज्या शरद ऊर्फ शे्या भोसले वय २४ रा. नेर ता खटाव जिल्हा सातारा (अटक), २ )विकास किरण शिंदे वय २५ रा. नांदल ता. फलटण जि. सातारा (अटक ), ३ ) रावश्या कोब्या काळे वय २५ मुळ रा. लासुर्ण हल्ली रा काठी ता इंदापूर जि पुणे (अटक), ४) दादा हनुमंत चव्हाण रा. गाववडी विसापुर ता. खटाव जिल्हा सानारा (अटक ),
५) कॅसेट उर्फ काशिनाथ ऊर्फ भिमराव भोसले वय ३५ रा आंदरुड ता फलटण जिल्हा सातारा (अटक), ६ ) लखन पोपट भोसले रा. वडगाव जयराम स्वामी ता.खटाव जिल्हा सातारा (पाहिजे / फरारी असलेला), यातील आरोपी १ ते ५ यांना अटक  करून गुन्ह्यातील ११३५००/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, गुन्ह्यातील आरोपी यांचेवर या अगोदर सातारा
जिल्हयातील- पुसेगाव, वडूज, औध, कोरेगाव, दहिवडी, लोणंद, सातारा शहर, फलटण ग्रामीण, सोलापुर जिल्हयातील-अकलूज, करमाळा, करकंब तसेच पुणे जिल्हयातील - बारामती शहर, इंदापुर, वडगाव निंबाळकर या पोलिस ठाण्याच्या हृद्दीतदरोडा, बलात्कारासह जबरी चोरी, जबरी चोरी, दरोडा तयारी, घरफोडी, चोरी यासारख्या गंभीर स्वरूपाचे एकुन २६ गुन्हे दाखल
आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपी यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई होणे कामी मा.श्री मनोज लोहिया सो विशेष पोलीस महानिरीक्षक
परिक्षेत्र कोल्हापुर विभाग, कोल्हापुर यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता, आरोपी त्यांनी केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप पाहता
त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई कामी प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री.नारायण शिरगावकर
उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती उपविभाग हे करीत आहे,
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मा. डॉ. अभिनव देशमुख सो, पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते सो बारामती विभाग बारामती, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर बारामती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पदमाकर बनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे स. पो.नि.सोमनाथ लांडे,
पो.स.ई.श्रीगणेश कवितके, योगेश शेलार, तसेच पोलीस अंमलदार स फौ. पोपट जाधव, पो.ना. सुर्यकांत कुलकर्णी, गोरख पवार,
बाळासाहेब पानसरे, पो.का.भाऊसाहेब मारकड, अमोल भुजबळ, पोपट नाळे, अक्षय सिताप, सलमान खान, ज्ञानेश्वर सानप यांनी
केलेली आहे.बारामती उपविभागात आत्तापर्यंत १९ गुन्हेगारी टोळ्यांतील एकूण १२५ आरोपींविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात
आलेबाबतची माहीती मा.श्री.नारायण शिरगावकर सो उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती यांनी दिलेली आहे.

No comments:

Post a Comment