छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलला ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मलेशियातून मदत - उमेश चव्हाण - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलला ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मलेशियातून मदत - उमेश चव्हाण

*छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलला ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मलेशियातून मदत - उमेश चव्हाण*

*पुणे -* एप्रिल महिन्यात पुण्यातील धानोरी येथे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कोविड - १९ हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली. आपल्या आईचे आणि पत्नीचे दागिने गहाण ठेऊन सुरू केलेले हॉस्पिटल म्हणून राज्यासह देशात - परदेशात या हॉस्पिटलला लोकप्रियता मिळाली. 
        ५३ बेडच्या या हॉस्पिटलमध्ये सर्वच बेड ऑक्सिजनयुक्त आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी २० बेड, जनरल २० बेड, तर १३ बेडसाठी आयसीयूची व्यवस्था आहे. सामाजिक कार्यकर्ते शांताराम खलसे, दशरथ माटवणकर, विकास साठे, श्रीराम पाटील यांनी केलेली मदतही उभारणीसाठी महत्वाची ठरली. 
        रुग्ण हक्क परिषदेच्या या उपक्रमासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलला मदतीसाठी अनेक हात पुढे आले. अगदी परदेशातूनही ऑस्ट्रेलियाहून मार्क्स तोरणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी एक लाख पस्तीस हजार रुपये पाठवले, मनोज मदने यांनी मलेशियातून तर विक्रमसिंह जाधव यांनी अमेरिकेतुन आर्थिक मदत पाठवून छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल चालविण्यासाठी केलेली मदत मोलाची ठरत आहे.
        परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, शासनाने ठरवून दिलेल्या दरात दर्जेदार उपचार करणे शक्य आहे. लोकांची लूट करणाऱ्या हॉस्पिटलने आमचा पॅटर्न लक्षात घेऊन उपचार केले तर लोकांची  लूट थांबेल. सध्या फक्त कोरोनावरील उपचारासाठी तब्बल ५३ बेड असलेल्या हॉस्पिटलमुळे आम्हाला बऱ्यापैकी अनुभव आला असून येत्या ऑगस्ट महिन्यात सर्वच रोग आणि आजारावर उपचार करणे शक्य होईल. यासाठी कायमस्वरूपी हॉस्पिटल निर्मिती सुरू आहे. यासाठीही सर्वांनी मदत करावी असे आवाहन आम्ही करत आहोत.

छत्रपती शिवाजी महाराज Covid - 19 हॉस्पिटल, धानोरी पुणे मो - 8956185706-7 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन केले

No comments:

Post a Comment