कोविड रुग्णांच्या चेहऱ्यावर अभाळाएव्हडा आनंद; ऑक्सिजन लावलेल्या कोविड रुग्णांनी टाळ्यांच्या लयीत धरला ताल!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

कोविड रुग्णांच्या चेहऱ्यावर अभाळाएव्हडा आनंद; ऑक्सिजन लावलेल्या कोविड रुग्णांनी टाळ्यांच्या लयीत धरला ताल!!

*कोविड रुग्णांच्या चेहऱ्यावर अभाळाएव्हडा आनंद; ऑक्सिजन लावलेल्या कोविड रुग्णांनी टाळ्यांच्या लयीत धरला ताल!!*

पुणे - तु मेरी जोहरा जबी, और इस दिल में, चोरीचा मामला या हिट गाण्यांसोबत शिर्डी वाले साईबाबा अश्या भक्तीगीतांनी प्रेक्षक टाळ्या वाजवत दाद देत होते, हा कार्यक्रम कुठे सार्वजनिक ठिकाणी नव्हता तर छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलमध्ये लोकगायक अमर पुणेकर, विनोद धिवार, कल्पना जगताप, विजय साळवी, प्रकाश दळवी यांनी सादर करून रुग्णांना त्यावर डोलायला लावले. 
       छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलचे संचालक उमेश चव्हाण यांच्या पुढाकाराने हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी रंगला! हॉस्पिटलचे संचालक शांताराम खलसे, सहायक पोलीस आयुक्त राजू मोरे, शिवसेनेचे आनंद गोयल, हॉस्पिटल व्यवस्थापक गिरीश घाग, अर्चना प्रधान, चंद्रकांत सरवदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सलीम आळतेकर, रुग्ण हक्क परिषदेचे अपर्णा साठे, विकास साठ्ये, संचालक दशरथ माटवणकर यांनी या सदाबहार कार्यक्रमाला उपस्थित राहून कोविड रुग्णांना या लढाईत एकटे नसल्याचे सांगितले.
        उमेश चव्हाण म्हणाले की, इतर आजाराशी लढताना कुटुंबीय, आप्तेष्ट, मुले - नातवंडे सोबत असतात मात्र कोविड रुग्णाला कोणालाही भेटता येत नसल्याने एकटेपणाची जाणीव होते. त्यामध्ये दररोजच्या वेगवेगळ्या तपासण्या, सातत्याने रुग्णाला दिले जाणारे उपचार यामुळे नैराश्य आल्यासारखे वाटते यातून बाहेर पडण्यासाठी आयोजित केलेल्या गीत संगीताचा कार्यक्रम यशस्वी ठरला.
      गायक अमर पुणेकर म्हणाले की, अनेक विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम केले, मात्र इथे संगीत सेवा करताना लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद हास्य पाहून खूप समाधान वाटले. ऑक्सिजन लावून पडून राहिलेला रूग्ण जेव्हा गीतांचे बोल ऐकून उठून बसला गाण्यांच्या ठेक्यावर टाळ्या वाजवत ताल धरू लागला तेव्हा त्यांची 'इम्युनिटी पॉवर' खऱ्या अर्थाने वाढली असल्याचे जाणवले.

No comments:

Post a Comment