दिव्यांग पती-पत्नीस, बेदम मारहाण, करून,संसार फेकला रस्त्यावर.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 7, 2021

दिव्यांग पती-पत्नीस, बेदम मारहाण, करून,संसार फेकला रस्त्यावर..

*दिव्यांग पती-पत्नीस, बेदम मारहाण, करून, घराची तोडफोड करून संसार फेकला रस्त्यावर..*

 माळशिरस:-दिनांक, 04मे 2021 वार्ताहर. मौजे. जांबुड, तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर, येथील रहिवासी, अनिता वाल्मीक कोळी, व त्यांचे पती, वाल्मीक नरहरी कोळी, यांना त्यांच्या राहत्या घरी, गावातील, रघुनाथ विठोबा बेलदार, यांच्या कुटुंबाने, बेदम मारहाण करून, महिलेचा विनयभंग करून, त्यांच्या गळ्यातील, मंगळसूत्र व कानातील फुले, लंपास केली.*
 सदर वरील घटनेमध्ये, गावातील, रघुनाथ बेलदार, व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, वारंवार अनिता वाल्मीक कोळी, व दिव्यांग वाल्मीक नरहरी कोळी, यांना वारंवार, घर खाली करण्यासंदर्भात, घरी जाऊन, जीवे मारण्याची धमकी देत होती. सदर जागा ही, ग्रामपंचायतीची, असून, अशाप्रकारे ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये, गावातील अनेक लोकांनी, आपले संसार उभे केले आहेत. गावातील इतर कोणत्याही कुटुंबाला, ग्रामपंचायत व इतर, कोणीही त्रास देत नाही. परंतु कोळी परिवार, हा गरीब असून,  अनिता कोळी यांचा पती, हे दिव्यांग आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ती अन्याय, होत आहे. यासंदर्भात, मौजे श्रीपुर ग्रामीण पोलीस, यांच्याकडे, आरोपी रघुनाथ बेलदर यांनी, अनिता वाल्मीक कोळी, यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर, श्रीपुर पोलीस स्टेशनचे पीआय,  झगडे साहेब,  यांनी फोनवरून,  अनिता कोळी यांना,  तुमच्यावरती तक्रार,  श्रीपुर पोलीस स्टेशन ला दाखल झालेली आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला हजर राहा.  असे सांगितल्यानंतर,  24 तारखेला,  शनिवार होता,  आणि त्या दिवशी,  अनिता कोळी या रोजंदारीने शेती वरती कामाला गेले होत्या, त्यामुळे त्या त्या दिवशी मला जाता. सोमवारी दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता, श्रीपुर पोलीस ठाणे येथे हजर झाले.  परंतु त्या ठिकाणी,  दुपारी तीन वाजेपर्यंत,  पीआय झगडे साहेब, व तक्रारदार,  हे हजर होऊ शकले नाहीत. तीन वाजल्यानंतर, त्याठिकाणी पीआय झगडे साहेब, व रघुनाथ बेलदर आणि अनिता कोळी,  यांच्याबरोबर चर्चा घडवून आणली.  या चर्चेमध्ये,  पोलिसांनी,  अनिता कोळी यांना,  जागा खाली करून द्या, असे सांगितले.  परंतु, त्या ठिकाणी मी गेली 40 वर्षांपासून वास्तव्यास आहे.  त्यामुळे मी ती जागा सोडणार नाही.  माझे पती अपंग आहेत,  आमच्याकडे व्यवसायासाठी साधन नाही.  जांभूळ ग्रामपंचायतीने,  आम्हाला घरकुल मंजूर करून,  देऊन सुद्धा,  त्या ठिकाणी गावातील काही,  लोकांच्या अडथळ्यामुळे, आम्हाला त्या ठिकाणी करकुल बांधून दिलेले नाही.  घरकुल बांधून घेण्यासाठी,  ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे.  व गेली चाळीस वर्षापासून त्या जागेची घरपट्टी,  व पाणीपट्टी,  अनिता वाल्मीक कोळी ह्या भरत आहेत. त्या जागेविषयी,  आम्ही कोणालाही त्याच्या वरती ताबा घेऊन देणार नाही. वेळप्रसंगी जीव गेला तरी चालेल, परंतु आमची मुले,  बेघर होऊ देणार नाही.  अशी भूमिका अनिता कोळी यांनी मांडून त्या ठिकाणाहून निघून आल्या.  त्यानंतर श्रीपुर पोलीस स्टेशनचे पीआय,पोलीस, झगडे साहेब, यांचे व मारहाण करणारे कुटुंब रघुनाथ बेलदर,  यांची व्यावहारिक तडजोड झाली, रूगनाथ बेलदर हे वाळू व्यावसायिक,  व सावकारकी करतात. व त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे,  त्यांनी श्रीपुर पोलीस स्टेशन व,  पानसरे साहेब यांना हाताशी धरून, अनिता कोळी यांना,  जीवे मारण्याची व, घर सोडून जाण्या संदर्भात धमकी दिली.सदर ही घटना घडल्यानंतर, त्याच दिवशी दिनांक,26एप्रिल2021 रोजी,  लेखी तक्रार, अनिता वाल्मीक कोळी. यांनी दिली होती. त्यानंतर 27 एप्रिल रोजी, रघुनाथ बेलदर यांच्या कुटुंबातील व्यक्तीनी अनिता कोळी यांच्या घरी येऊन, जीवे मारण्याची पुन्हा धमकी दिली.त्यामुळे घाबरून जाऊन, अनिता कोळी यांनी पुन्हा एकदा, 27 एप्रिल रोजी. श्रीपुर ग्रामीण पोलीस ठाणे, या ठिकाणी,लेखी तक्रार दिली. व त्यानंतर लगेच अकलूज पोलीस स्टेशनला,  लेखी तक्रार दाखल केली. परंतु,दोन्ही तक्रारीची नोंद, श्रीपुर ग्रामीण पोलीस टेशन व अकलूज पोलीस स्टेशन यांनी, न घेतल्यामुळे,  आरोपी. रघुनाथ बेलदर, व त्यांच्या परिवारातील लोकांनी, दिनांक 30 एप्रिल रोजी,  सकाळी 11 वाजता, अनिता कोळी व वाल्मीक कोळी,  यांच्या घरी जाऊन, त्यांना बेदम मारहाण करून, अपंग असणाऱ्या,  वाल्मीक कोळी यांना, दुसराही हात काढून टाकण्याची धमकी, व ट्रॅक्टर खाली घालून, मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच त्यांची पत्नी,  अनिता कोळी यांच्या, अंगावरती बसून,  विनयभंग करून, त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, व कानातील फुले, बेलदर परिवाराने गायब केली. त्यासंदर्भात, अनिता वाल्मीक कोळी. यांनी अकलूज पोलीस स्टेशन, या ठिकाणी, केस दाखल केलेली आहे. यामध्ये मारहाण व विनयभंग करणारे *आरोपी, रघुनाथ विठोबा बेलदर, महेश रघुनाथ बेलदर, शिवाजी रघुनाथ बेलदर, अशोक रघुनाथ बेलदर, लक्ष्मी अशोक बेलदर, चैतन्य महेश बेलदर, रघुनाथ बेलदर यांची पत्नी, शिवाजी बेलदर यांची पत्नी,हे सर्व राहणार. मौजे जांबुड तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर* येथील असून, यांच्या वरती कलम. *भारतीय दंड संहिता 1860, अनुसार, कलम 143, 147,149,323,324,354,427,452,504,506,व अपंग कायदा कलम 2016,अंतर्गत कलम 92,अंतर्गत कारवाई झालेली आहे*.सदर गुन्हा घडला त्या दिवशी,गावामध्ये ग्रामपंचायत,ची मिटिंग.ग्रामपंचायत मध्ये होती.परंतु ग्रामपंचायतीमधील,कोणीही.घटना घडलेल्या ठिकाणी,हजर झाले नाही.गावातील, ग्रामसेवक, सरपंच,उपसरपंच,सदस्य. पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष,यापैकी कोणीही, पीडित कुटुंबाची,दखल घ्यायला, किंवा विचारपूस करायला,दिनांक 4 मेपर्यंत,कोणीही आले नाही.सदर वरील आरोपी वरती, दरोडा,टाकने, व दिव्यांग व्यक्तीस मारहाण केल्यामुळे,प्रहार अपंग क्रांती संघटना,व प्रहार जनशक्ती पक्ष, यांच्यावतीने,पीडित कुटुंबाची भेट,प्रहार जनशक्ती पक्ष,जिल्हा समन्वयक,अनिल लिंबाजी आसबे, सोमनाथ भोसले,प्रहार कार्यकर्ता,यांनी कुटुंबाची भेट घेऊन, माननीय.बच्चुभाऊ कडू साहेब राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य,यांच्या आदेशानुसार,संबंधित आरोपी वरती,जास्तीत जास्त कडक,  शासन,  करण्यासाठी, संबंधित, तपास अधिकारी अकलूज पोलीस स्टेशन, पानसरे साहेब, यांच्याबरोबर फोनवरती चर्चा करून, सदर ग्रामपंचायतीचे सरपंच, यांना फोनवरती,  बोलून,  कुटुंबास न्याय देण्यासाठी, सांगितलेले आहे. मौजे जांबुड गावचे सरपंच, अविनाश खरात, यांनी संबंधित कुटुंबाची, येणाऱ्या दोन दिवसांमध्ये, भेट घेऊन, झालेली नुकसान भरपाई,  सर्वांच्या सहमतीने, करून देतो. व संबंधित जागा, कोळी कुटुंबास,  खुली करून देण्यासंदर्भात, माननीय, गौरव जाधव,  पी ए, बच्चू कडू साहेब महाराष्ट्र राज्य राज्यमंत्री, यांना शब्द दिला आहे. कोळी कुटुंबास योग्य न्याय न मिळाल्यास, माननीय आमदार बच्चू कडू साहेब, राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य,  यांच्या आदेशाने, पुढील कार्यवाही करण्यात येईल. महाराष्ट्रातील कोणत्याही दिव्यांग व्यक्ती वर, अन्याय जर कोणी करत असेल, तर त्यांना, कायदेशीर मार्गानेच, किंवा कायदा हातात, घेऊन प्रहार स्टाईलने धडा शिकवला जाईल. 
वरील सर्व घटनेमध्ये, गावातील,  जवळजवळ सत्तर टक्के,  रहिवासी जमीन,  ग्रामपंचायतच्या अधिपत्याखाली आले आहे.  त्यामध्ये अनधिकृतपणे,  प्रत्येकाने आपल्या बळाच्या जोरावर ती,  जागा लपवून ठेवलेली आहे. तरी शासनाने यामध्ये लक्ष घालून, या गावातील सर्व कामांची,  व अनधिकृत,  जागा बळकावलेल्या,  (अनावश्यक)अशा सर्वांची चौकशी होऊन.  गरीब निराधार बेघर लोकांना, न्याय मिळवून द्यावा.  सदर या गावांमध्ये सगळीकडे,  गोरगरीब जनतेवर अन्याय केला जात आहे.  शासनाच्या प्रत्येक सुविधा यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी,  लाच दिल्याशिवाय कोणतीही योजना मिळत नाही.  तरी याची सर्वच बाबतीत सखोल चौकशी होऊन, कोळी कुटुंबास, न्याय मिळवून देण्यात यावा यासाठी,*गौरव जाधव,  पी ए, आमदार बच्चू कडू साहेब महाराष्ट्र राज्य राज्यमंत्री, विजय पुरी, प्रहार अपंग क्रांती संघटना, जिल्हा उपाध्यक्ष, शहाजी देशमुख, प्रहार अपंग क्रांती संघटना, संपर्कप्रमुख, अनिल आसबे, प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा समन्वयक, व सोमनाथ भोसले, प्रहार कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक नवरे, दलित महासंघ युवा आघाडी माळशिरस तालुका प्रमुख, पिंटू भोसले,  प्रहार अपंग क्रांती संघटना माजी जिल्हाध्यक्ष,यांनी, सहकार्य, व पुढील काळात येणाऱ्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी कोळी कुटुंबास, आधार,  व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पुढील तपास,  अकलूज पोलिस स्टेशनचे पीआय, पानसरे साहेब यांच्याकडे, असून,  त्यांचा तपास चालू आहे.
 पानसरे साहेब. अकलूज पोलीस स्टेशन. संपर्क नंबर.+919422673249
 अविनाश खरात सरपंच जांभूड. संपर्क नंबर.9922549946.
 ग्रामसेवक, जांबुड कुंभार साहेब.+91 99226 21545
 पोलीस पाटील जांभूड बाळासाहेब चंदनशिव 98608 53210.

 सदर वरील घटना घडून आज दिनांक, 6 मे2021 पर्यंत, कोणताही शासकीय अधिकारी किंवा,  ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच,  तंटामुक्ती अध्यक्ष, यापैकी कोणीही या कुटुंबास,भेट देऊन विचारपूस केलेली नाही. यावरून या गावांमध्ये, गोरगरीब,  व अपंग कुटुंबावर ती,अन्याय होऊनही,  माणुसकी हरवलेले गाव, एवढा एकच शब्द या पुरेसा आहे.
 गरज आहे ती या कुटुंबाच्या पाठीशी सक्षम पणे उभा राहून,  त्यांना न्याय मिळवून स्वतःचे घर, त्यांना मिळवून देण्याचे,  हे काम प्रहार अपंग क्रांती संघटना, माननीय बच्चुभाऊ कडू,  राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य,  यांच्या आदेशाने,  सौ संजीवनी ताई बारंगुळे प्रहार अपंग क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष सोलापूर,दत्ताभाऊ मस्के पाटील, प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष सोलापूर, यांच्या नेतृत्वाखाली, या कुटुंबास न्याय देण्याचे काम केले जाईल.

No comments:

Post a Comment