जिल्हा परिषद सदस्य चे पती व राष्ट्रवादीचे युवा नेत्यावर गोळीबार.. माळेगाव:- माळेगाव च्या जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती व राष्ट्रवादी कॉग्रेस चे युवा नेता रविराज तावरे लाखे(चिक्कू पाटील) यांच्यावर आज संध्याकाळी गोळीबार झाला. बारामतीतील खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. रविराज तावरे यांना गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना बारामतीतील खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल केला आहे.मात्र हा गोळीबार का झाला आणि कोणी केला
याचा तपास पोलीस करत आहेत . बारामतीतील
बारामती हॉस्पिटल मध्ये त्यांना उपचारासाठी
तातडीने दाखल करण्यात आले आहे. माळेगावातील संभाजीनगर भागात हा गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे. अजून या विषयी पूर्ण माहिती नाही. तसेच पोलिसांकडूनही यासंदर्भात गुप्तता पाळली जात आहे त्यामुळे बारामती तालुक्यात व शहरात खळबळ उड़ाली आहे.नुकताच बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या एका सरचिटणीस वर गोळीबार करण्याची धमकीची बातमी ताजी असतानाच हा प्रकार घडला असल्याने पुन्हा एकदा बारामतीत असा प्रकार घडल्याने चिंता व्यक्त होत आहे.तर पोलीस अधिक तपास करीत आहे.
No comments:
Post a Comment