बारामती भाजपच्या वतीने पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराचा जाहीर निषेध!
बारामती:- Covid-19 च्या काळात लॉकडाउन व संचारबंदी लागू असताना दि.५/५/२०२१ रोजी बारामती मध्ये सोशल डिस्टन्स व कायद्याचे पालन करून भारतीय जनता पार्टी च्या वतीने पश्चिम बंगालमध्ये* विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तांध तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेला हिंसाचार ही लोकशाहीची हत्या आहे. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आज राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करीत आहेत. त्याचा भाग म्हणून बारामती शहर व तालुका भाजपच्या* वतीने भारतीय जनता पार्टी कार्यालय बारामती व तहसील कचेरी बारामती येथे आंदोलन करण्यात आले.पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे, तसेच महिलांवर बलात्कार करणे मृतदेह उलटे झाडाला लटकवणे असले घाणेरडे प्रकार घडत आहेत. या निंदनीय कृत्याचा बारामती शहरव तालुका भाजपच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला .या प्रसंगी भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष- सतिश फाळके तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष-पांडुरंग(मामा)कचरे पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस-अविनाश मोटे पुणे जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य-गोविंदराव देवकाते व बारामती तालुका युवा मोर्चा अध्यक्ष-ज्ञानेश्वर माने,रघु चौधर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment