लॉकडाऊनमुळे सलून व्यवसाय बंद कारागिरावर उपासमारीची वेळ
नगर:-कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २४ मार्चच्या मध्यरात्री पासून लॉकडाऊन केला आहे. जवळपास दिड महिण्यापेक्षा अधिक सलूनचे दुकान बंद असल्यामुळे रोजगारा अभावी
कारागीरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
राज्य शासनाने फेरीवाल्यांना दिड हजार रुपये मदत जाहीर केली आहे.याचबरोबर इतरही वर्गांना मदत जाहीर केली.परंतु सलुन , दुकानदार आणि कारागिरांना मात्र लॉकडाऊनच्या काळात आर्थिक मदत जाहीर केली नसल्यामुळे नाभिक समाजात राज्य सरकारविरुध्द संताप व्यक्त होत आहे.गेल्या दिड महिन्यापासून सलून व्यवसाय बंद आहे.परिणामी सलून दुकानदारास खोली भाडे देण्यासाठी देखील पैसे नाहीत , त्यामुळे दिवसेंदिवस भाडे वाढत आहे.सलून दुकान चालक आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत.दुकानामधील कारागिरांची देखील उपजिवीका भागत नाही , त्यामुळे कुटूंबावर देखील उपासमार आलेली आहे. राज्य शासनाने सलून दुकानचालक आणि कारागिरांना किमान पाच हजार रुपयांची तरी आर्थिक मदत देवुन सहकार्य करावे , अशी मागणी नाभिक सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.असे नाभिक सेवा संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख अहमदनगर मा.श्री.हर्षद विनायक शिर्के पाटील प्रसिद्ध माध्यमाशी बोलत होते
No comments:
Post a Comment