देशाला संकटातुन बाहेरकाढणारा युवा ऐकमेवस्त्रोत-सुजित सोरटे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

देशाला संकटातुन बाहेरकाढणारा युवा ऐकमेवस्त्रोत-सुजित सोरटे

देशाला संकटातुन बाहेरकाढणारा युवा ऐकमेवस्त्रोत-सुजित सोरटे
सोरटेवाडी:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान,सोरटेवाडी यांनी गावामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले.तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन अजित(दादा)चव्हाण यांच्या हस्ते केले  तसेच या वेळेस गावचे सरपंच उपसरपंच आणि गावातील आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी रक्ताची जाणवणारी कमतरता याविषयी सुजित सोरटे यांनी चिंता व्यक्त केली.त्याचबरोबर सर्व समाजबांधवांना   कोरोना बाधित असलेल्या कुटुंबियांची मदत करण्याची आवाहन केले.युवक हा देशावर आलेल्या संकटाला धुडकावून लावणारा एकप्रकारे स्त्रोत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली व युवकांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहनदेखील यावेळेस केले.केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील सर्व प्रतिष्ठित मान्यवरांनी रक्तदान करून ५१ बाटल्यांचे रक्तसंकलित झाले.तसेच ग्रामपंचायतीचे क्लार्क सागर बांदल यांचेदेखील मोलाचे सहकार्य लाभले, या वेळेस अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे सुजीत सोरटे,(डावीकडून पाचवे)विक्रांत मासाळ,गणेश मासाळ,वैभव मासाळ,प्रसाद गडदे,नितीन बिचकुले तसेच सार्थक डोंबाळे,कार्तिक कर्चे,रुतिक बरकडे,भूषण सोरटे,गणेश सोरटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment