उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नागरिकांना विनंती करून मानले आभार - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 6, 2021

उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नागरिकांना विनंती करून मानले आभार

उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नागरिकांना विनंती करून मानले आभार 
बारामती:-बारामती शहर व तालुक्यामधील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी सात दिवस  बारामती तालुका व शहर परिसर पूर्णपणे Lockdown करण्यात आला आहे.आज दिनांक 05/05/21 रोजी बारामती शहर व तालुक्यातील नागरिकांनी अतिशय चांगला प्रतिसाद देउन  प्रशासनाला सहकार्य केले आहे. त्याबद्दल प्रथमता सर्व बारामतीकरांचे पोलिस  प्रशासनाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो.पोलिसांची नजर चुकवून काही लोक काही ना काही कारण काढून बाहेर पडतातच त्याच्यावर विशेष पथकांमार्फत नजर ठेवून त्यांच्यावर आरोग्य विभाग बारामती व मंगल लॅब बारामती यांच्या सहकार्याने विनाकारण फिरणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांची Antigen Test केली असता 150 पैकी 10 लोक पॉझिटिव आले. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर त्या सर्वांच्या गाड्या या पोलिस स्टेशनला जप्त करण्यात आले असून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. इथून पुढे विनाकारण फिरणाऱ्या लोकांच्यावर अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे.
    लसीकरण करन्याकरिता बऱ्याच नागरिकांची ये-जा दिसून येते त्यांना सर्वांना कळकळीची विनंती आहे की ज्या नागरिकांचं रजिस्ट्रेशन झालेल आहे. त्यांनीच लसीकरण करण्यासाठी जावे.सदरचा 7 दिवसाचा lockdown अधिक कडकपणे अंमलबजावणी करण्यासाठी महसूल प्रशासन,बारामती नगरपरिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग यांचे सहकार्य लाभले.आज ज्या पद्धतीने बारामतीकरांचे सहकार्य लाभले तसेच पुढील काळात मिळावे ही विनंती नारायण शिरगावकर ,डी. वाय. एस.पी.बारामती यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment