प्रिय सतीश उर्फ बिट्या......या मित्रासाठी एका मित्राने मांडली आठवणींचे क्षण........ - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 7, 2021

प्रिय सतीश उर्फ बिट्या......या मित्रासाठी एका मित्राने मांडली आठवणींचे क्षण........

प्रिय सतीश उर्फ बिट्या......या मित्रासाठी एका मित्राने मांडली आठवणींचे क्षण........                                                                        *आप्पा (कै.सुजित बागल) मला १० जानेवारी २०१७ रोजी  कायमचा सोडून गेला, तेव्हा माझा मित्र सतीश(सतीश विष्णू लोंढे) गोव्यात होता जेव्हा गोव्यावरून परत आला तेव्हा त्याने मला शब्द दिला " तू काही काळजी करू नकोस आप्पा गेला तरी दुसरा आप्पा तुझ्या पाठीमागे कायम उभा राहील" आणि तो शब्द त्यांनी अखेरपर्यंत पाळला सतीश आणि माझी ओळख पहिल्यापासून होते ती ओळख म्हणजे कुठे दिसला तरी हात वर करणे व पुढे जाणे येवढ्या पर्यंतच मर्यादित होती पण त्याने ज्या वेळेस स्विमिंग चालू केले व त्याच्या मुलांना घेऊन तो स्विमिंग टॅंक वर येऊ लागला तो नाना बर्गे (स्विमिंग कोच) यांच्याकडे मुलांना स्विमिंग शिकवण्यासाठी घेऊन येऊ लागला त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही रोज भेटू लागलो मग नाना बर्गे आम्हाला स्विमिंग झाल्यावर चहा पिण्यासाठी संतोष आसलकर  यांच्या चहा स्टॉल वर घेऊन येऊ लागले व तेथेच आमचा ग्रुप तयार झाला, त्यामध्ये नाना बर्गे, सतीश लोंढे ,अमित ढोले ,शंभू आगवणे, अनिल दळवी ,महेश गावडे ,उमेश काळे, जगदीश पटेल, वैभव धुमाळ ,राजा मत्रे ,ओमासे साहेब व सुधीर शिंदे यांचा ग्रुप तयार झाला व त्या ग्रुपचे नाव 'डॉल्फिन ग्रुप' देण्याचे ठरले व त्यासाठी ग्रुपचे टीशर्ट पण छापण्यात आले त्यावेळेस प्रत्येकाचे वाढदिवस साजरे करणे तो दिवस म्हणजे फुलून जायचा जायचा दिवस असायचा वाढदिवसाला हार बनवायचा म्हणजे वाळलेल्या फुलांचा हार घ्यायचा केकचे प्रकार म्हणजे असा कोणी बनविला नसेल म्हणजे त्या व्यक्तीचे टोपण नाव त्याप्रमाणे केक बनवायचे उदाहरणार्थ अण्णा, वायरमन ,मूल्या, केळ्या इत्यादी प्रकारचे नावे असत त्याबद्दल कल्पनाच न केलेली बरी, त्यामध्ये एकमेकांना मारपण द्यायचं एक दिवस माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मी गैरहजर असताना सतीश ने अशी पैज लावली की आज पाऊस पडणार नाही आणि त्या दिवशी तर खूप आभाळ आले होते आणि जो हरेल त्यांनी पार्टी द्यायची ठरली आणि त्या दिवशी खूप पाऊस पडला व अमितने व शिवशंभु ने मला फोन करून सांगितले ची सतीश पैज हरला ,दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्या वाढदिवसाची पार्टी दिली मी त्याला एकट्याला विचारले अशी पैज का लावली तर तो मला म्हणाला कि नाना तुझ्या वाढदिवसा दिवशी मला पार्टी द्यायची होती पण तू पार्टी घेतली नसते म्हणून मी अशी पैज लावली. मी नवीन घर बांधले होते त्याच्या वास्तूशांती चे मॅनेजमेंट त्यांने स्वतः त्याच्याकडे ठेवले ब्राह्मण काका पासून आचार्य पर्यंत तसेच पाणी जार आणण्यापर्यंत ते वास्तुपुरुष पुरण्यापर्यंत हे सर्व काम त्यांनी चोख केले, घर बांधून पूर्ण झाले पण माझ्या घराची गेट राहिले होते ते त्यांनी स्वतः रात्रभर जागून दोन दिवसात पूर्ण केले, असा तो माझा जिवलग मित्र सतीश होता .वास्तुशांतीचे गिफ्ट काय द्यायचे हे डॉल्फिन ग्रुप मध्ये टीव्ही घ्यायचा ठरले होते पण माझ्या मित्राने डॉल्फिन ग्रुपच्या मेंबरला अंधारात ठेवून स्वतःची सोन्याची चैन गहाण ठेवून 30 हजार रुपयांचा टीव्ही गिफ्ट म्हणून दिला. त्याची आठवण म्हणून त्यांनी स्वतःच्या हाताने माझ्या घरातील अंगणात चार ते पाच झाडे लावलेली आहे मित्रा मी तुझ्यावर खूप चिडलो आहे कारण तू एवढा आजारी असताना तू ॲडमिट झाल्यावर  नंतर दोन दिवसांनी तू स्वतः फोन करून मला सांगितले नाना मी खूप आजारी आहे माझा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव चा अहवाल आला आहे यातून मला वाचव मला हे ऐकून धक्काच बसला मी त्याला भेटायला देशपांडे हॉस्पिटल मध्ये गेलो त्यावेळेस तो मला म्हणाला कोणी नाही आले भेटायला तरी चालेल पण तू आला म्हणून मी धन्य झालो मी जिंकलो अशी भावना मला झाली,मी त्यावेळी त्याला म्हणालो  हनुमान स्तोत्र व शिव तांडव स्तोत्र त्यामुळे तुमच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल व  तू बरा होशील मी त्याला म्हणालो तुझ्यासाठी पंढरपूरहुन औषध आणतो मी माझ्या मेव्हण्याला फोन करून सांगितले त्याने लगेच जलद गतीने रातोरात पंढरपूर हुन औषध आणले पण दुर्दैवाने त्याच्या पोटात जाऊ शकले नाही त्याचा अंत ३ मे २०२१ रोजी झाला, त्याने पाठवलेला शेवटचा मेसेज  "नाना मी तुझ्यावर रुसणार नाही कधी, कारण तू माझा जीव आहेस"  तेव्हा मलाही राहवलं नाही मित्रा तुझ्यासाठी चार ओळी माझ्या मनात कायमच तुझ्यासाठी घोंघावत  आहेत त्या तुला मी मनापासून अर्पण करतो,                           " जो आसानी से मिले, वो है धोका, जो मुष्कील से मिले,वो है इज्जत, जो दिल से मिले,वो है प्यार,   और जो नसीब से मिले, हो हे दोस्त"...      .तेरे जैसा यार कहा, कहा कोई याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना........                            *मिस यू सतीश*

No comments:

Post a Comment