*पुणे शहरातील रुग्णांनी छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलचा लाभ घ्यावा - उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे*
पुणे :- रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्माण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज covid-19 हॉस्पिटल ची रचना आदर्शवत आहे. अत्यंत अल्प कालावधीमध्ये शासकीय सर्व परवानग्यांची पूर्तता करून उभारलेले हे कोविड हॉस्पिटल सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असे आहे, यामध्ये दर्जेदार उच्चशिक्षित तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या हॉस्पिटल सेवेचा पुणे शहरातील रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पुण्याचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी आज केले.
उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आज विश्रांतवाडी जवळील धानोरी येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज covid-19 हॉस्पिटलला भेट दिली, यावेळी ते बोलत होते. कोविड हॉस्पिटलची पाहणी केल्यानंतर त्यांनी रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, डॉ. मेघना सणस, डॉ. सलीम आळतेकर, डॉ. नलिनी नागरे, डॉ. प्रीती उपश्याम व्यवस्थापक अर्चना प्रधान, अपर्णा साठे, गिरीश घाग, विकास साठ्ये, उपस्थित होते. यावेळी कोविड रुग्णांवर करावयाच्या उपचारांसंबंधी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
उमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीतच निर्माण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज covid-19 हॉस्पिटलचे पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र कौतुक होत असताना पुण्यनगरीचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी नागरिकांना या ठिकाणी दर्जेदार उपचार मिळतील, अशी पसंतीची पावती देत गौरवोद्गार काढले.
No comments:
Post a Comment