*बारामतीत बुद्ध जयंती साधेपणाने साजरी*
बारामती दि.२६ : अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज बारामती शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी अत्यंत शिस्तबद्ध आणि सध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
शहरात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत बुद्ध पूजापाठ घेऊन तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आले.शहरातील सिद्धार्थ नगर,चंद्रमणी नगर,प्रबुद्ध नगर,पंचशील नगर या ठिकाणी सामुदायिक पूजापाठाचे कार्यक्रम संपन्न झाले.यावेळी बौद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित असलेला जगातील एकमेव धम्म असल्याचे सांगत बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सर्व भारतीयांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी बारामतीचे माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण,पोलीस उप निरीक्षक दिलीप सोनवणे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी कोरोनाच्या संसर्गांने मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरम्यान,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे गौतम शिंदे,ॲड.सुशिल अहिवळे,प्रा.रमेश मोरे,चेतन शिंदे,कैलास शिंदे,गजानन गायकवाड,सोमनाथ रणदिवे,चंद्रकांत भोसले,शुभम अहिवळे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment