*इस्कॉन बारामती तर्फे विशेष कोविड चर्चासत्राचे आयोजन*
बारामती:-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तीव्रतेमुळे आपण सर्वच भयभीत आहोत. सध्याच्या कोविड महामारीच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मनात आरोग्यासंबंधी योग्य काळजी कशी घ्यावी, योग्य इलाज काय असू शकतात आणि हृदयातील भीतीचे निवारण कसे करावे असे विविध प्रश्न आहेत. अशा सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरे देण्यासाठी इस्कॉन बारामती तर्फे 'विशेष कोविड चर्चासत्र' या ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ या संस्थेने सामाजिक बांधिलकी यादृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कोविड परिस्थितीत आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. संतोष चाकूरकर (मार्च २०२० पासून हजारो कोविड रोग्यांचा इलाज केला आहे), डॉ किशोर रुपनवर (कोविड तज्ञ), डॉ रेखा रुपनवर (स्रीरोग तज्ञ), वैद्या सरोजिनी खोमणे (आयुर्वेद तज्ञा) व नंद दुलाल दास उपलब्ध झाले. या विषयाला अनुसरून तज्ञांचे मार्गदर्शन व प्रश्न-उत्तरे सत्र असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. कोविड परिस्थितीत रोगाची लक्षणे, योग्य निदान व वेळेवर उपलब्ध उपचारांचे महत्त्व, स्तीआरोग्य, लसीकरण, आहाराचे व्यवस्थापन, योगा व प्राणायामचे महत्व, मानसिक व भावनिक स्पंदने, अध्यात्मिकता या व अशा विविध प्रश्नांचा मागोवा घेण्यात आला. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त बारामतीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आले होते. तरी या विशेष उपक्रमासाठी सुमारे तीनशे बारामतीकरांनी सक्रिय सहभाग नोंदविला व लाभ घेतला असे कळविण्यात आले.
No comments:
Post a Comment