सातव कोविड हॉस्पिटलम मधुन २०० रुग्णांना डिस्चार्ज
डॉ.सुनील पवार व महालक्ष्मी उदयोग समूहाचे रुग्ण व नातेवाईकांकडून आभार
बारामती (दि.१८)प्रतिनिधी: वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांना मदतीच्या उद्देशाने आदरणीय शरदचंद्रजी पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रीया सुळे.यांच्या मार्गदर्शनखाली बारामती नगरीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांनी "सातव शाळा, कसबा-बारामती" याठिकाणी सर्वोत्तम कोवीड हॉस्पिटल व कोविड सेंटर उभारले आहे.या कोवीड हॉस्पिटलची जबाबदारी गटनेते सचिन सातव, नितीन सातव व सुरज सातव हे योग्य पद्धतीने हाताळत असुन कोविड हॉस्पिटलमधून आता पर्यंत २०० रुग्ण डिस्चार्ज मिळाला आहे.
सातव कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे ३० बेड उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेनुसार येथे व्हेंटिलेटर लावलेले आहेत.सेंटर मध्ये औषध व रुग्णाच्या तपासण्याचा खर्च रुग्णांच्या नातेवाइकांना करावा लागतो तर इतर सुविधा मोफत पुरविल्या जातात .कोविड हॉस्पिटलमध्ये १५ डॉक्टर व नर्सिंग स्टाफ २४ तास कार्यरत आहेत.येथे रक्त तपासणी व औषधांची सुविधा केली असुन रुग्णांना किंवा नातेवाईकांना यासाठी धावपळ करावी लागत नसुन येथे २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध केलेली आहे.
रुग्णाला आजारातून मुक्त होण्यासाठी नाममात्र दरात चांगली व दर्जेदार सुविधा सुसज्ज आयसीयू व्यवस्था, वेळेवर औषध,सकस व दर्जेदार आहार,
स्वच्छता, पिण्यासाठी आरओ सिस्टीम चे पाणी, बाहेर बसण्यासाठी केलेली सुसज्ज व्यवस्था, मनोरंजनासाठी टिव्ही सिस्टीम, सॅनेटायजर करणारे फॅन येथे बसविले आहेत.येथे रुग्णांची आस्थेवाईक पणे देखभाल केली जाते सातव परिवाकडून प्रत्येक रुग्णाला मानसीक आधार हा स्वतः सचिन, नितीन,सुरज सातव डॉक्टर, परिचारिका व स्वयंसेवक आस्थेवाईकपणे चौकशी करतात त्यामुळे रुग्णाचे मनोबल वाढून कोरोना मुक्त होत आहेत.येथे मिळणाऱ्या सुविधांचा कोरोना मुक्त पेशंट व नातेवाईक प्रशंसा करत आहेत.
तसेच करोनाचा प्रादुर्भाव पाहता (दि.१२) रोजी प्रभाग १० माळेगाव कॉलनी येथील प्राथमिक शाळेत कोविड लसीकरण केंद्र सुरु केले आहे. या सर्व सुविधा करण्यामध्ये बारामती येथील प्रशासकीय यंत्रणा, डॉक्टर्स, सिव्हिल सर्जन पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचा बहुमूल्य सहकार्य लाभले आहे.
माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे जेएष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली त्यावेळी पवार यांनी बारामतीतील सातव कोविड हॉस्पिटलची अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्याकडून वेळोवेळी माहिती घेतल्याचे सांगत सातव कुटुंबीयांकडून महालक्ष्मी उद्योग समूह व डॉ. पवार यांच्या कामाचे कौतुक केले करून शुभेच्छा दिल्या व मदत करण्याचे आश्वासन दिले
रुग्ण - जयसिंग नामदेव जगदाळे (वय ६५)
यांची हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर दोन दिवसांनी ऑक्सिजन पातळी खालावली मात्र योग्य उपचार करुन रुग्णाला लागणारी औषध कोविड हॉस्पिटलमध्ये उपलब्द झाल्याने रुग्णाची अवस्था सुधारून आता ते सुखरूप पणे घरी गेले आहेत.
रुग्ण - सुनील किसन खोमणे - राहणार शारदा नगर माळेगाव रोड बारामती माझा एचआरसीटी स्कोर २० असल्याने मला शहरातील कोणत्याही दवाखाण्यात बेड उपलब्ध झाला नाही मात्र अडचणीच्या वेळी डॉ.सुनील पवार यांनी सचिन सातव यांना सांगून हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून दिला तेथील उपचार, स्वच्छ परिसर तत्पर स्टाफ मुळे या कठीण परिस्थितीत देखील आठ दिवसात मी बरा होऊन ठणठणीत घरी आलो आहे.याचे श्रेय सातव हॉस्पिटल,सातव परिवार यांनी तत्परतेने माझा प्राण वाचवले तर येथे केवळ औषधाचे पैसे द्यावे लागले जेवण,नाष्टाअंडी तसेच इतर कोणताही खर्च त्यांनी घेतला नाही
No comments:
Post a Comment