पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिम्मित प्रशासनाकडून अभिवादन
बारामती दि.31 :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जात, पात, धर्म, पंथ, प्रांतांच्या, सीमा ओलांडून संपूर्ण देशात लोकोपयोगी कार्याचा डोंगर उभा केला. देशभर मंदिर, नदीघाट, धर्मशाळा, पाणपोयी बांधल्या. अनिष्ठ रुढी, प्रथा, परंपरा यांच्याविरुद्ध लढा दिला. आज त्यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.
बारामती तहसिल कार्यालयामध्ये आज झालेल्या कार्यक्रमामध्ये तहसिलदार श्री. विजय पाटील यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी निवासी नायब तहसिलदार श्री. धनंजय जाधव, निवडणूक नायब तहसिलदार श्रीमती पी. डी. शिंदे तसेच तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment