*अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रुग्णांना आमरस व भोजन वाटप*
बारामती:- शहरात अद्ययावत उत्तम सोयीसुविधा उपलब्ध होत असल्याने बारामती शहराच्या ग्रामीण भागातून व इतर तालुक्यातून बारामती शहरांतील दवाखान्यांमध्ये रुग्ण संख्येत वाढ होत आहे. याच कालखंडात कडकडीत लॉक डाऊन असल्याने रुग्णांची जेवणाची गैरसोय होत आहे हे लक्षात आले. बारामती शहरातील देसाई इस्टेट मधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बारामती शहराचे कार्याध्यक्ष मा.विशाल पोपटराव जाधव व मित्र परिवारातील तरुण युवक तसेच प्रवीणशेठ बोरा त्यांच्या पत्नी सपना बोरा आई सुशीला बोरा भाऊ महावीर बोरा त्यांची पत्नी .....बोरा यांनी रुग्णांना मोफत जेवण पुरविण्याचे ठरविले. रोज २५० ते ३०० रुग्णांना तसेच ज्या नातेवाईकांची जेवणाची गैरसोय आहे अश्या नातेवाईकांना ते विनामूल्य जेवण पुरवत आहेत आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लोकांना रोजच्या जेवणासोबत आमरस सुध्दा देण्यात आला प्रवीणशेठ बोरा यांच्या आई सुशीला बोरा यांचे वय ८० वर्षे असून सुद्धा त्या सकाळी लवकर उठून जेवण बनविण्यात मदत करतात. अजूनही माणुसकी शिल्लक आहे, मानवता अजूनही शिल्लक आहे याचे उत्तम उदाहरण आपणास देसाई इस्टेट मधील या बोरा कुटुंबीय व तरुण युवकांकडून पहावयास मिळेल. आज अचानक बारामती शहराचे पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी भेट दिली* तेथील स्वच्छ्ता, नीटनेटके पणा पाहून खूप खुश झाले. ते म्हणाले निस्वार्थी सेवा करणाऱ्या लोकांची आज समाजाला गरज आहे. स्वतः जेवण तयार करून ज्यांना खरी गरज आहे त्यांना पोहचविले जाते त्यातच खरे पुण्य व माणुसकी आहे. त्यांनी या पुण्याच्या कामास खूप खूप शुभेच्छा दिल्या. रोज सायंकाळी मा.विशाल पोपटराव जाधव यांच्या मार्फत चहा, कॉफी चे वाटप केले जाते*जेवण व भाजी-पाला आणण्याच्या व्यवस्थेसाठी मित्रपरिवारातील कार्यकर्ते सचिन (बंडा) मोरे यांनी आपली स्वतःची खाजगी कार लॉक डाऊन संपेपर्यंत विनामूल्य वापरण्यास दिलेली आहे. अनेक दानशूर व्यक्ती समोर येऊन मदत करत आहेत.
या मध्ये बोरा कुटुंबाचे व मित्रपरिवारातील *सागर मोहिते, हर्ष बोरा, निशांत शेंडगे,देवेश बोरा, हिमांशू गालिंदे,नेहाल दामोदरे हे दिवसभर काम करत आहेत.सर्व स्तरातून बोरा कुटुंबीयांचे व देसाई इस्टेट मधील विशाल जाधव मित्रपरिवाराचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment