RPI (आठवले) बारामती शहराच्या पाठपुराव्याला यश!!
बारामती:-बारामती शहर व तालुक्यातील वाढती करोनाग्रस्त रुग्णांची संख्या लक्षात घेता बारामती शहरातील अशोकनगर भागातील प्रस्तावीत कोविड रुग्णालय तत्काळ सुरू करण्यात यावे
यासंबंधीचे लेखी निवेदन रिपाइं (आठवले)बारामती शहर मार्फत दि.27/4/2021 रोजी प्रांताधिकारीसाहेब, बारामती यांना देण्यात आले होते.त्याअनुषंगाने दि.4/5/2021 रोजी पासून अशोकनगर भागातील कोविड रुग्णालय हे बारामतीकरांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले.त्याबद्दल मी सर्वच प्रशासकीय आधिकऱ्यांचे, संबंधित रुग्णालयाचे सर्वेसर्वा डॉ.कदम सर यांचे तमाम बारामतीकरांच्या वतीने जाहीर आभार मानतो तसेच संबंधित रुग्णालय सुरू करण्यासाठी माझ्यासोबत वारंवार पाठपुरावा करणारे माझे सहकारी RPI (आठवले) बारामती शहर अध्यक्ष अभिजित कांबळे,सम्राट गायकवाड,अविनाश कांबळे,मोईन बागवान तसेच भाजपाचे अक्षय गायकवाड,सचिन मोरे यासर्वांचे देखील आभार.त्याचप्रमाणे संबंधित कोविड रुग्णालयामध्ये येणाऱ्या कोवीडग्रस्त रुग्णांवर योग्य तो औषधोपचार माफक दरात केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो अशी माहिती रविंद्र(पप्पू)सोनवणे युवक सरचिटणीस पुणे जिल्हा RPI (आठवले) यांनी दिली.
No comments:
Post a Comment