गोळीबार हल्ल्यातील आरोपींना पाच तासात अटक,बारामती ग्रामीण पोलिसांची कामगिरी.. बारामती/माळेगाव:-काल दि ३१/५/२०२१ रोजी सायंकाळी ०६:४५वा चे सुमारास माळेगाव येथे संभाजीनगर मध्ये
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रविराज तावरे यांचेवर कोणीतरी दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला असल्याचे समजल्याने सदर घटनेची माहिती मा.पोलीस अधिक्षक सो,मा.अपर पोलीस अधिक्षक सो, मा.डी वाय एस पी सो यांना तात्काळ देवुन आमचे अधिकारी व कर्मचारी घेवून तात्काळ घटनास्थळी रवाना झालो त्यावेळी जखमी रविराज तावरे यांना तेथे जमलेल्या लोकांनी बारामती हॉस्पीटल येथे उपचार कामी नेल्याचे समजले त्यावेळी मा.पोलीस अधिक्षक सो यांनी आम्हाला तपासा सदर्भात सुचना दिल्या व त्यांनी वेगवेगळी पथके बनवण्या संदर्भात सुचना दिल्या त्याप्रमाणे आम्ही सहा. पोलीस निरीक्षक लंगुटे ,पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांच्या टिम बनवुन पोलीस खब-या मार्फत मिळालेल्या बातमी नुसार त्यांना रवाना केले सदरचे आरोपी हे उरूळी कांचन येथे असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली नंतर सदर ठिकाणी मी व डी.बी टिम तसेच पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांनी सदर आरोपीना ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणले त्यामधील एक आरोपी अल्पवयीन असुन दुसरा आरोपी हा माळेगावचा
राहणारा असुन त्याचे नाव राहुल उर्फ रिबेल यादव असल्याची समजले त्यानंतर फिर्यादीमध्ये फिर्यादी सौ रोहिणी रविराज तावरे यांनी सांगितल्याप्रमाणे सदर घटनेचा आरोपी प्रशांत मोरे यास स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पुणे ग्रामीण यांनी ताब्यात घेतले या घटनेमध्ये फिर्यादी या पुणे जिल्हा परिषद सदस्य असुन त्यांनी केलेल्या विकास कामांचा राग मनात धरून फिर्यादी यांचे कार्यकर्त्यांना वारंवार धमकविण्याचा प्रयत्न करून राजकिय व आर्थिक
फायदा मिळविणेचे हेतुन फिर्यादीचे पती यांना संपवुन त्यायोगी दहशत माजविणेचे हेतुने कट रचुन फिर्यादिचे पती यांना जिवे ठार मारण्याचे उददेशाने अग्नशास्त्र व्दारे जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये फिर्यादीचे पती जखमी झाले असल्याने फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरून सदर इसमांचेवर बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.कलम ३०७,१२०ब,५०४,५०६,३४ आर्म अॅक्ट ३(२५),(२७) याअन्वये गुन्हा नोंद करणेत आला आहे.यातील आरोपी प्रशांत मोरे ,विनोद उर्फ टॉम मोरे,राहुल उर्फ रिबल यादव,व एक अल्पवयीन मुलगा असल्याने त्यांना गुन्हा
घडले पासुन ५ तासात बारामती तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक सो, पुणे ग्रामीण डॉ अभिनव देशमुख सो , मा.अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहीते साो,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर सो,बारामती उपविभाग बारामती
यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहा.पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे,पोसई नितीन मोहीते, राहुल पांढरे,नंदु जाधव,विजय वाघमोडे,विनोद लोखंडे,नितीन चव्हाण,दिपक दराडे,निखिल जाधव, यांनी केली आहे.अशी माहिती महेश ढवाण पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन बारामती तालुका यांनी दिली.
No comments:
Post a Comment