उपमुख्यमंत्री यांच्या निकटवर्तीय युवा नेता रविराज तावरे गोळीबार प्रकरणी आरोपीवर मोक्का.. बारामती:- नुकताच गोळीबार हा विषय खूप गाजला होता त्याला कारणही तसेच होते बारामती व इंदापूर तालुक्यात गोळीबार प्रकरण चांगलेच चर्चेत होते काही दिवसात गोळीबार करण्याची धमकी, गोळीबार झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने चर्चा खूप झाली होती याचीच दखल घेत पोलीस अधिकारी यांनी तपासाच्या कामात वेग आणून अगदी काही दिवसात मोक्का सारखी कारवाई करीत आहे याबाबत असे की,बारामती तालुक्यातील माळेगाव-पणदरे जिल्हा परिषद गटाच्या सदस्या रोहिणी तावरे यांचे पती, राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत
असलेल्या प्रशांत मोरे टोळीतील चौघांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार (मोक्का) कारवाई केली. कारवाई झालेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे
निरीक्षक महेश ढवाण यावेळी उपस्थित होते. प्रशांत पोपटराव मोरे (वय 47, रा. शिवनगर, माळेगाव),विनोद उर्फ टॉम पोपटराव मोरे व राहूल उर्फ रिबल कृष्णांत यादव व एका अल्पवयीनाचा कारवाईमध्ये समावेश आहे. 31 मे रोजी सायंकाळी 6.45 वाजता रविराज तावरे यांच्यावर माळेगावात मोरे टोळीने गोळीबार करत प्राणघातक हल्ला केला होता. तावरे हे पत्नीसह वडापाव घेवून मोटारीकडे येत असताना त्यांच्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणी रोहिणी रविराज तावरे यांनी फिर्याद दिली होती.त्यावेळी संपूर्ण बारामती तालुक्यासह इतर भागात वातावरण भीतीमय झाले होते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय
असलेल्या रविराज यांच्यावरील गोळीबाराने
तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी घटनेनंतर पाच तासांतच आरोपींना जेरबंद केले होते. पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख,अप्पर अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनेदिवशीच पोलिस अधिक्षकांनी कठोर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार अवघ्या
15 दिवसांत या टोळीवर मोक्कातर्गत कारवाई
करण्यात आली.जिल्हा परिषद सदस्य पदाच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा रोष मनात धरून फिर्यादी व त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न मोरे टोळीकडून
केला जात होता. त्यातून राजकिय व आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने रविराज यांना संपवून दहशत माजविण्यासाठी कट रचून अल्पवयीन मुलामार्फत खूनी हल्ला केला गेला. पोलिसांनी प्राणघातक हल्ल्यासह शस्त्र अधिनियम 120 ब आदी कलमांनुसार
मोरे टोळीवर गुन्हा दाखल केला होता.या टोळीतील सदस्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी
स्वरुपाची आहे. प्रशांत मोरे याच्यावर नऊ, विनोद मोरे याच्यावर सात तर राहूल मोरे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक ढवाण यांनी पोलिस अधिक्षकांमार्फत मोक्काचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठवला होता. त्याला नुकतीच मंजूरी मिळाली.याबाबत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली.
No comments:
Post a Comment