बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामती पोलीसांनी केली अटक..कांदिवली पोलिसांनी दिली होती माहिती.! बारामती:-दिनांक ३०/६/२०२१ रोजी बारामती शहर पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्यावर हजर असतांना बारामती शहर पोस्टेचे पोनि श्री नामदेव शिंदे यांना कांदीवली पोलीस स्टेशन वरिष्ठ पोनि बाबासाहेब साळुंखे यांनी फोनवदारे कळविले की,कांदीवली पोलीस स्टेशन गुरनं ५९१/२०२१ भादवी कलम २६८,२७०,२७४,२७५, २७६,४१९,४२०, १८८,४६५, ४६७,४६८, ४७०,४७१,३४ माहिती तत्रज्ञान अधिनियम ४३,६६(सी) साथीचे रोग अधिनियम कलम ३ प्रमाणे दाखल आहे.सदरच्या गुन्हयाची व्याप्ती फार मोठी असुन त्यामध्ये मा उच्च न्यायालय, मुंबइ यांचे आदेशान्वये सदरचा गुन्हा
दाखल करण्यात आलेला आहे.सदर गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी नामे राजेश पांडे उर्फ राजेश दयाशंकर पांडे हा एका नामांकित हॉस्पिटल मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणुन नोकरीस असतांना त्याने व त्याचे साथीदारांनी मिळुन भेसळ युक्त द्रव कोर्हीड १९ ची लस असल्याचे भासवुण लोकांचा कॅम्प आयोजीत करून सिल तुटलेल्या व्हॅक्सीन बाटल्या मधुन भेसळयुक्त लस देवुन
लोकांची फसवणुक करून लसीकरण केलेल्या लोकांना मुंबई मधील वेगवेगळ्या नामांकित
हॉस्पिटलचे लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र देवुन त्यांची फसवणुक केलेली आहे.त्यामुळे सदरचा आरोपी हा गुन्हा घडल्यापासुन अटक चुकविण्यासाठी मुंबई शहरातील वेगवेगळया ठिकाणी वास्तव्य करत आहे तसेच सदरचा आरोपी हा पोलीसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी पुणे शहर व परिसरात आल्याची माहिती
मिळत आहे.असे फोनव्दारे कळविल्याने लागलीच मा पोनि श्री नामदेव शिंदे सो बारामती शहर पो.स्टे. यांनी स्वत: पथक तयार करून त्यामध्ये सपोनि पालवे, पोकॉ २४३३ शेंडगे व पोकॉ १४३६ कोकणे यांना सोबत घेवुन घटनेचे गांभीर्य समजावुन सांगुन पोस्टे हददीत आरोपीचा शोध घेत असतांना सदर गुन्हयातील आरोपी हा अमृता लॉज,भिगवण रोड बारामती या ठिकाणी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने लागलीच त्या ठिकाणी रवाना होवुन आरोपी हा चाणाक्ष, हुशार व उच्च शिक्षित असल्याने
त्यास ताब्यात घेण्यासाठी सापाळा रचुन शिताफिने व तो पळुन जाणार नाही याची खबरदारी घेवुन आरोपीस ताब्यात घेतले.आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर सदर बाबत कांदीवली पोलीस स्टेशन चे वरिष्ठ
पोलीस निरिक्षक श्री बाबासाहेब सांळुखे साहेब यांचेशी संपर्क केलेला असुन त्यांनी सदर आरोपीस ताब्यात घेणेकामी पोलीस स्टेशनची टिम कांदीवली, मुंबई याठिकाणा वरून बारामती येथे रवाना केली असल्याचे सांगितले आहे.गंभीर गुन्हयातील सदर आरोपीस कांदीवली पोलीस स्टेशनची टिम येताच त्यांचे ताब्यात देण्याची तरजविज ठेवलेली आहे.सदरची कामगीरी मा पोलीस अधिक्षक श्री अभिनव देशमुख ,पुणे ग्रामिण,मा अप्पर पोलीस अधिक्षक श्री मिलींद मोहिते बारामती विभाग, बारामती, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर बारामती विभाग बारामती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक नामदेव
शिंदे,बारामती शहर पोलीस स्टेशन,सहा पोलीस निरिक्षक मुकुंद पालवे, पोलीस अंमलदार
२४३३/नवनाथ शेंडगे व १४३६/ सविन कोकणे यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment