वाढदिवसानिमित्त बाहेरील राज्यातून आलेल्या मजूरवर्गाला भाजीपाल्याचे किट वाटप... वडगाव:- वाढदिवस म्हटले की मौज मजा करायची मोठ मोठ्या आवाजात फटाक्यांची आतिशबाजी ,गाड्यांची रॅली काढायची आशा विविध प्रकारे काही जण आपला वाढदिवस साजरा करीत असतात.पण बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष पै. नानासाहेब मदने यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळुन बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात रोजगारासाठी आलेल्या 50 कुटुंबाना पै.नानासाहेब मदने व बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने भाजी पाल्याचे वाटप करण्यात आले.
सध्या कोरोना या महामारी रोगाचे सकंट पुर्ण देशावरती आहे. त्यामुळे अनेक लोकांना कामे धंदे नाहीत त्यामुळे त्यांच्यावरती उपास मारीची वेळ आली आहे.वाढदिवसाचा आण आवशक खर्च टाळुन पै. नानासाहेब मदने यांनी संपुर्ण समाज्या पुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
नानासाहेब मदने यांनी वाढदिवसानिमित्त बाहेरील राज्यातून आलेल्या मजूरवर्गाला भाजीपाल्याचे किट वाटप केल्याने वडगाव निंबाळकर आणि परीसरात त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळे मास्क सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स ठेऊन भाजी पाल्याचे कीट वाटप करण्यात आले या कार्यक्रमा प्रसंगी ध्येय करिअर अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष अमित चव्हाण सर,युवा उद्योजक सौरभ दरेकर,कोऱ्हाळे खुर्द ग्रा. सदस्य सुरज खोमणे,आकाश वाघमारे ,तानाजी गायकवाड,निलेश आगम,सुनिल जाधव,इकबाल आत्तार,सतिश खराडे,सोमनाथ राठोड,विनोद खोमणे,मनोज दीक्षित,शिवाजी लोणकर,कैलास आगम,वडगाव निंबाळकर ग्रा.सदस्य आण्णा भोसले,सेतुराज होळकर,विराज शेंडगे,संदिप कांबळे व मित्र परिवार उपस्थित होता.
**--परकीय राज्यातून महाराष्ट्र राज्यात आपल्या पोटाची उपजीविका भागविण्यासाठी आलेल्या कुटुंबाला भाजी पाल्याचे किट वाटप करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहुन मन खुप भरून आले.समाजाचे काय तरी आपण देणं लागतो म्हणून फुल नाही फुलांची पाकळी म्हणून हा छोटासा उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं..**
No comments:
Post a Comment