बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडून चायनीज मांजा विकी करणारे दुकानदारांवर कारवाई
बारामती:-आज दि.२३/०६/२०२१ रोजी नामदेव शिंदे पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन यांना मिळाले माहिती वरून त्यांनी बारामती शहर पालीस स्टशेन कडील स.पो नि वाघमारे,स पो नि दंडीले,सहायक फौजदार निकम,सहा.फौजदार जगदाळे, पो कॉ कोकणे १४३६ पो कॉ चव्हाण २७५०, पो.कॉ शेख १४८७ पो.कॉ इंगोले १८८० यांना मा.मुख्य सचिव पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांनी त्याचेकडील आदेश क सीआरटी २०१५/सीआर/३७/टीसी२ दि.३०/०३/२०१५अन्वये पर्यावरण संरक्षण कायदा सन १९८६ नुसार प्लास्टिक नायलन सिन्थिटीक मांजाने पक्षी व
मनुष्यास होणारे इजा (दुखापत) पासुन संरक्षण व्हावे याकरंता संबंधीत मांजा जवळ बाळगणेस त्याचा वापर विक्री करण्यास मनाई आदेश काढले आहेत तसेच मा.उच्च न्यायालय तर्फे वेळोवेळी मांजा विक्री प्रतिबंधाबाबत निर्देश दिले
आहेत.त्यामध्ये प्लास्टिक नायलन सिन्थिटीक पासुन बनविन्यात येणारे मांजा वापरास, जवळ बाळगण्यास बंदी घातलेली असताना मांजा विकी करणाऱ्या दुकानदारांवर विशेष मोहिम राबवुन कारवाई करण्याबात सुचना दिल्या नुसार आम्हा
जुनी भाजी मंडई येथे पंच व पोलीस स्टाफसह कशीश टेडर्स व तेजस जनरल स्टेाअर्स नावचे दुकानात छापा घातला असता मांजा गुडळण्याकरता वापरलेली सिल्वर रंगाची इलेक्ट्रीक दान मशीन तसेच मांजा चे १८ बंडल असा एकुण ११४००/-रू किंमतीचा मुददेमाल जप्त करून सदर इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.गुन्हयाचा तपास म.स.पो.नि शेंडगे सो हे करीत आहेत.सदरची कामगिरी मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहीते साो,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर साो,नामदेव शिंदे,पोलीस निरीक्षक,यांचे मार्गदर्शनाखाली श्री प्रकाश वाघमारे,सहायक पोलीस निरीक्षक,उमेश दंडीले सहायक पोालीस निरीक्षक, सहा.फौजदार निकम,सहा. फौजदार जगदाळे,सहायक फौजदार माळी, पो.
का तुषार चव्हाण,पो.काँ अकबर शेख,पेा.काँ कोकणे १४३६,पो.का नुतन जाधव २५०५,पो.कॉ अजित राउत,पो.कॉ दशरथ इंगोले यांनी केली.
No comments:
Post a Comment