महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात ओबीसी आणि मराठा आरक्षणाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, June 26, 2021

महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात ओबीसी आणि मराठा आरक्षणाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन...

महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात ओबीसी आणि मराठा आरक्षणाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन...                बारामती:- महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात ओबीसी आणि मराठा आरक्षणाकडे महाविकासआघाडी सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आज राज्यभरात
भाजपकडून राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून बारामतीत भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. बारामती शहरातील भाजप कार्यालयापासून हलगी वाजवत  भाजप
कार्यकर्त्यांकडून शहरातील तीनहत्ती चौका शेजारी भिगवण रोड वर ठिय्या मांडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात शहर व तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्याचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. आंदोलनादरम्यान महाविकासआघाडी सरकार
विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.ओबीसीला आरक्षण मिळू नये म्हणून महाविकास आघाडी सरकारने जाणून बुजून प्रयत्न केले आहेत. पंधरा वेळा इम्पीरियल डाटा
मागूनही न्यायालयाला सादर केला नाही. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाले, आरक्षण रद्द करण्यासाठी आघाडी सरकारने जाणून-बुजून
केलेली ही कृती असून ओबीसींच्या विरोधातील ह्या सरकारने ओबीसींचे फार मोठे नुकसान केले असल्याचा आरोप भाजपचे बारामती तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी यावेळी केला.यावेळी भाजपचे जेष्ठ नेते बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे,तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे, बारामती शहर अध्यक्ष सतीश फाळके सह अनेक पदाधिकारी व महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment