मराठा आरक्षण हे कधीही सिद्ध न होणारे, कुणालाही न मिळणारे, कृत्रिमरीत्या तयार केलेल्या काल्पनिक आरक्षणाचा मसुदा आहे - उमेश चव्हाण
पुणे :- आरक्षणाच्या निकषात न बसणाऱ्या समाजाला कृत्रिम - काल्पनिक मसुदा बनवून उन्नती आणि विकास फक्त आरक्षणामुळे होऊ शकते असे भासवून मराठा समाजाची गेली अनेक वर्षे फसवणूक सुरू आहे. असे मत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
या देशातील भारतीय संविधान विरोधी धर्मांध गटाला मागासवर्गीयांचेआरक्षण संपवायचे आहे. त्यामुळेच त्यांनी एकीकडे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्याना बदनाम करायचे तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशा पद्धतीचे भावनिक वातावरण गेल्या काही दशकात तयार केले आहे.
ज्यावेळी सरकार, मंत्रिमंडळ किंवा सर्वोच्च न्यायालय यांच्याकडून मराठा आरक्षण मिळणार नाही. हे सिद्ध झाले की, मराठा समाजातील भावनिक तरुणांची माथी भडकावून, "आम्हाला आरक्षण नाही, तर कोणालाच आरक्षण नाही." अशी भूमिका घेऊन दलित विरुद्ध मराठा अशा पद्धतीचे दंगलीचे वातावरण निर्माण करण्यासाठी जातीय तेढ निर्माण करण्यासाठी मराठा समाजाचा वापर होत आहे. सर्व प्रकारचे आरक्षण नष्ट करताना धर्मांध लोकांची डोकी फुटू नयेत, तर मराठा आणि दलित युवकांची माथी फुटावीत. घरे जाळली जावीत. यासाठी मराठा आरक्षण आणि त्यासंबंधीचे राजकारण गेली अनेक वर्ष-अनेक दशके राज्यात घडविले जात आहे.
महाविकास आघाडी विरोधात विनायक मेटे, उदयनराजे भोसले, आणि कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे भोसले हे सध्या मराठा आरक्षणाचे नेतृत्व करत आहेत. तथापि विनायक मेटे यांना मानणारा वर्ग अत्यंत कमी आहे. राज्यव्यापी मराठा समाजाचे नेतृत्व करायचे ठरल्यास उदयनराजे भोसले यांच्या नावाला पहिल्या क्रमांकाची पसंती आहे. तर युवराज संभाजीराजे भोसले यांच्या नावाला दुसऱ्या क्रमांकाची पसंती आहे. पाच जून रोजी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत बीड येथे विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली तर युवराज संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली रायगडावर शक्ती प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. रायगडावर बीड पेक्षा जास्त गर्दी जमेल, मात्र सरककट समाज सहभागी होणार नाही. असेही उमेश चव्हाण म्हणाले.
No comments:
Post a Comment