*रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर अध्यक्ष पदी हाफिज नासिर शेख यांची नियुक्ती*
पुणे -दि. १५ जून :- जगातील पहिली रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून रुग्ण हक्क परिषद स्थापनेपासून अवघ्या काही वर्षातच देशात प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठरली आहे. रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्त आणि कमी दरात सर्वसामान्य माणसाला उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी रुग्ण हक्क परिषद गेली अनेक वर्ष काम करीत आहे. यातून सुमारे पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांचे उपचार रुग्णांना मोफत मिळाले आहेत.
रुग्ण हक्क परिषद या संघटनेची मुहूर्तमेढ पुणे शहरात करण्यात आली. याच पुणे शहरामध्ये परिषदेचे केंद्रीय प्रधान कार्यालय देखील आहे. गांधी आणि आंबेडकर या राष्ट्रपुरुषांच्या विचारधारेवर आधारित लोकशाही आणि अहिंसक पद्धतीचे विचार रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून लोक कार्यासाठी करण्यात येतात. पुणे कोंढवा येथील हाफिज नासिर शेख यांची रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी नुकतीच निवड जाहीर करण्यात आली. हाफिज नासिर शेख यांच्या आधी सहा महिने विकास साठे यांच्याकडे पुणे शहराचे अध्यक्षपद हंगामी स्वरूपात होते. हाफिज शेख यांना शहराध्यक्षपदी निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते दिले. हाफिज नासीर शेख हे नासिर फाउंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील सेवा करीत आहेत. हाफिज नासीर शेख यांनी पुण्यातील कोंढवा हडपसर वडगाव शेरी या भागांमध्ये डेंटल क्लिनिक आणि तीन जनरल स्थापना करून अवघ्या वीस रुपयांमध्ये नागरिकांना तपासणी आणि उपचार करण्याचे सेवाकार्य सुरू केले आहे. रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी हाफिज नासिर शेख यांची निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नियुक्तीची शिफारस रुग्णहक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख डॉ. सलीम आळतेकर यांनी केली.
No comments:
Post a Comment