इंदापूर येथील खुनाचे गुन्हयातील पाहिजे असलेले दोघे आरोपी अकलूज जि.सोलापूर येथून जेरबंद : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 15, 2021

इंदापूर येथील खुनाचे गुन्हयातील पाहिजे असलेले दोघे आरोपी अकलूज जि.सोलापूर येथून जेरबंद : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी

इंदापूर येथील खुनाचे गुन्हयातील पाहिजे असलेले दोघे आरोपी अकलूज जि.सोलापूर येथून जेरबंद : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी
   इंदापूर:-  दिनांक १७/०१/२०२१ रोजी सायंकाळी ०७.०० वा.चे सुमारास दादा कांबळे रा.बावडा ता.इंदापूर या सरूबाईच्या नातेवाईकाने त्याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करून फिर्यादी मंजुषा महादेव गोरवे वय ५१ वर्षे रा.टाकळी टेंभुर्णी ता.माढा  जि.सोलापूर हिचा मुलगा संजय महादेव गोरवे वय २८ वर्षे यास त्याने त्याचे मित्र लकी विजय भोसले व महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे यांचे करवी बोलावुन घेवुन सरूबाई, सुष्मिता व काजल यांचेशी संजय याची जवळीक संबध असलेचा संशय घेवुन त्यांनी संगनमत करून दि. १७/०१/२०२१ रोजी रात्री ०७.०० वा.चे नंतर ते दि.२०/०१/२०२१ रोजी सकाळी १०.३० वा.चे दरम्यान मौजे बावडा गणेशवाडी गावचे हद्दीत फिर्यादीचा मुलगा संजय यास कोणत्यातरी धारधार हत्याराने जिवे ठार मारून त्याचे दोन्ही हात, पाय व डोके कापून कोठेतरी फेकुन देवुन मृतदेह (धड) भिमानदीच्या पात्रात त्याची ओळख पटु नये याकरीता फेकुन दिलेबाबतचे  फिर्यादिवरून *इंदापुर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३१/२०२१ भादंवि क. ३०२,२०१,३४ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल* करण्यात आलेला होता.
     सदर गुन्हयात यापूर्वी ३ आरोपी अटक करण्यात  आलेले होते. गुन्हयातील निष्पन्न असलेले उर्वरीत दोघे आरोपी हे गुन्हा घडले पासून फरार होते.
     मा.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आदेशाने रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना, आज दिनांक १५/६/२०२१ रोजी LCB टिमला सदर गुन्हयातील पाहिजे असलेले दोघे आरोपी हे अकलूज जि.सोलापूर येथे येणार असल्याची बातमी मिळालेवरुन त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी नामे 
*१.अजय उर्फ प्रदिप प्रकाश खरात वय २० वर्षे*
*२.प्रमोद प्रताप खरात वय २१ वर्षे दोघे रा.माळशिरस ता.माळशिरस जि.सोलापूर*  
    यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर दोन्ही आरोपींची वैदयकिय तपासणी करुन त्यांना पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे .

     *सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट,सपोनि सचिन काळे,पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड,पोहवा. सुभाष राऊत,पोहवा. जनार्दन शेळके,पो.ना. गुरु गायकवाड,पो.ना. अभिजित एकाशिंगे,
पो.ना. राजू मोमीन,पो.ना. मंगेश थिगळे,
पो.ना. अजित भुजबळ,चा.पोहवा. काशिनाथ राजापुरे यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment