युवक क्रांती दल यांच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना फी कमी होणेसाठी साठी निवेदन पुणे:- युवक क्रांती दल महाराष्ट्र यांच्या वतीने ना. उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री,
यांना सर्व शाखेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची फी कमी करण्याचा निर्णय तातडीने घेण्याबाबत निवेदन देण्यात आले,मार्च 2020 पासून देशावर करोनाचे मोठे संकट असून, महाराष्ट्रातही कोरोनाचा मोठा प्रा्र्भाव आहे.संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे उदयोगधंदे, व्यवसाय, शेती इ. आर्थिक अडचणीत आहेत तसेच बऱ्याच पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत सध्याच्या परिस्थितीत पालक आर्थिक विवंचनेत आहेत.गेल्या एक वर्षापासून विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने चालू आहे. विद्यार्थी एकही दिवस कॉलेजला गेले नाहीत. कोणत्याही साधनसामग्रीचा वापर विदयार्थ्यांनी केलेला नाही. मात्र महाविद्यालयांकडून संपूर्ण फी आकारली जात आहे यामध्ये Maintenance charges, Laboratory fee,Gym fee, Computer lab fee, Uniform fee, Study Material, Stationary fee, Internet charges, Field
work, Extra-curricular activities, Vehicie charges असे अनेक प्रकारचे शुल्क आकारले जात आहेत.आर्थिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी फी भरलेली नाही. अशा विद्यार्थ्याचे परीक्षा अर्ज महाविद्यालयांनी Inward करुन घेतले नाहीत तसेच Internal exam ला बसू दिले नाही. यामुळे विद्यार्थी
व पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. महाविद्यालयीन फी कमी व्हावी याबाबत
विद्यार्य्यांकडून गुगल फॉर्मदवारे 6000 हून अधिक तक्रारी युवक क्रांली दल संघटनेकडे आल्या आहेत.सध्या आपण घेतलेल्या निर्णयाचा लाभ फक्त शासकीय अभियांत्रिकीच्या विध्यार्थीनाच मिळणारआहे. परंतु इतर अनेक व्यावसायिक, पारंपरिक कोर्सेसची फी मोठ्या प्रमाणात आहे. अशा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची फी कमी व्हावी, यासाठी शासकीय व खासगी असे निकष न लावता सरसकट सर्व शाखेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची फी कमी करण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणीचे निवेदन जांबुवंत मनोहर(राज्य संघटक) ,सचिन पांडुळे(पुणे शहर अध्यक्ष),कमलाकर शेटे(उपाध्यक्ष पुणे शहर) यांनी केली.
No comments:
Post a Comment