राजर्षी शाहू महाराजांची जयंती सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने वृक्षरोपण करून साजरी
मावळ:- छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सम्यक विद्यार्थी आंदोलन मावळ तालुका च्या वतीने झाडे लावून जयंती साजरी करण्यात आली. सध्याच्या काळात कोरोनाची परिस्थिती आणि वृक्षरोपणाची असणारी गरज लक्षात घेता सर्वांनी आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती झाडे लावून साजरी करण्याचा निर्णय घेतला.
वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने "झाडे लावा आणि त्याचे संगोपन करा" असा संदेश देण्यात आला. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अबोली भालेराव, अंजली भालेराव, करण भालेराव, अर्चना कांबळे, ऐश्वर्या भालेराव, सुमित भालेराव तसेच आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती सम्यक विद्यार्थी आंदोलन चे मावळ तालुका प्रतिनिधी अबोली भालेराव यांनी दिली.
No comments:
Post a Comment