*सहकारी पोलिसांनी खाकी वर्दी ची शान वाढवली : नामदेव शिंदे*
दत्तात्रय थोरात व दिलीप सोनवणे यांचा सेवा निवृत्ती सोहळा संपन्न
बारामती: खाकी वर्दी मध्ये सुद्धा माणुसकी असते,अनेक संकटे झेलत,समाज्यातील स्थित्यंतरे सांभाळत दिलेली जवाबदारी समर्थपणे पेलत सहकारी पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी खाकी वर्दीची शान वाढवली असे गौरवोद्गार बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी काढले .
शहर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक दिलीप सोनवणे व सहायक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय थोरात यांच्या सेवा निवृत्ती कार्यक्रम प्रसंगी नामदेव शिंदे बोलत होते या वेळी परिक्षाविधीन उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ,सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे व अधिकारी कर्मचारी व कुटूंबीय उपस्तीत होते.
सोनवणे व थोरात यांनी निष्कलंक व उत्कृष्ट सेवा बजावल्यामुळे अनेक पदकांचे मानकरी ठरले व पोलीस खात्याची मान उंचावेल अशी कामगिरी केली असून त्यांचे काम आदर्शवत असल्याचे नामदेव शिंदे यांनी सांगितले.
मोर्चा, आंदोलन,निवडणुका, आदी ठिकाणी बंदोवस्त केला,जीव धोख्यात घालून अनेक आरोपींना पकडले,वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली जवाबदारी समर्थपणे पार पाडली,सहकाऱ्यांनी दिलेली साथ यामुळे सेवा निवृत्ती यशस्वीपणे होत आहे याचा आनंद असल्याचे दिलीप सोनवणे व दत्तात्रय थोरात यांनी सांगितले.
* *एक तासासाठी बनविले पोलीस निरीक्षक* *
पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सेवा निवृत्ती सत्कार नंतर सोनवणे व थोरात याना अनोख्या पद्धतीने निरोप दिला
पोलीस निरीक्षक च्या खुर्ची वर बसवून एका तासा साठी त्यांना कार्यभार सांभाळण्यास दिला
त्यामुळे दोघेही आनंदी व समाधानी होऊन कुटूंबीय समवेत फोटोसेशन केले व निरोप घेताना डोळ्यातुन आनंदाश्रू वाहू लागले
No comments:
Post a Comment