गोमांस वाहतुक करणारा वाहनचालक बेपत्ता,अजून घरी न आल्याने पत्नीने दिली तक्रार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, June 14, 2021

गोमांस वाहतुक करणारा वाहनचालक बेपत्ता,अजून घरी न आल्याने पत्नीने दिली तक्रार..

गोमांस वाहतुक करणारा वाहनचालक बेपत्ता,अजून घरी न आल्याने पत्नीने दिली तक्रार..
 दौंड (प्रतिनिधी):- तालुक्यातील रावणगाव हद्दीत काही दिवसांपुर्वी बेकायदा गोमांसची वाहतुक करताना अडविल्यानंतर या वाहनामधील वाहनचालक आणि क्लिनर हे अंधाराचा फायदा घेवून पसार झाले होते. मात्र वाहनचालक रफिक मेहबूब तांबोळी हा सहा दिवस उलटूनही घरी आला नसल्याने त्याची पत्नी
रेश्मा तांबोळी यांनी दौंड पोलीस स्टेशनला याबाबत फिर्याद दिली आहे.याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, 5 जुन 2021 रोजी पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील रावणगाव हद्दीत महामार्गावर
पुणे बाजूकडे जात असताना अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो (क्रमांक एम. एच. 01, डी. आर.1542 ) मध्ये बेकायदेशीररित्या गोमांस वाहतूक करीत होते. पोलिसांना या वाहनाचा संशय आला होता. मात्र याच दिवशी चालक आणि क्लिनर यांनी टेम्पो जागीच थांबवून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.याबाबत दौंड पोलीस स्टेशनमध्ये प्राणी संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय 26 रा. शिवाजीनगर पुणे ) यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला होता.दरम्यान, यातील चालक हा 9 जून 2021 पर्यंत त्याच्या राहते घरी न आल्याने शनिवारी (दि.12 ) रोजी पत्नी रेश्मा रफिक तांबोळी यांनी दौंड पोलीस स्टेशनला येऊन माझे पती आत्तापर्यंत आमच्या घरी आले नाहीत अशी तक्रार दिली आहे.त्यानुसार रफिक मेहबूब तांबोळी (वय 35) रंग सावळा, उंची 170 सेंटीमीटर, केस काळे वाढलेले,चेहरा उभट, नाक सरळ, अंगात पांढरा रंगाचा शर्ट,आकाशी रंगाची पॅन्ट, पायात पांढरी चप्पल, उजवा पाय गुडघ्यापासून जळलेला, या वर्णनाचा व्यक्ती कोणाला आढळल्यास दौंड पोलीस स्टेशन दूरध्वनी क्रमांक
02117-262333,
मो 7722011165, 7218085520 ) या नंबरवर संपर्क करावा असे अहवान   दौंड पोलिसांनी केले आहे

No comments:

Post a Comment