बारामती क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीयदर्जाच्या दोन लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, June 14, 2021

बारामती क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीयदर्जाच्या दोन लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन

बारामती क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय
दर्जाच्या दोन लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन

बारामती दि  14: जिल्हा क्रीडा संकुल पुणे (बारामती) मधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन लॉन टेनिस  कोर्ट चे उद्घाटन महावितरणचे  मुख्य कार्यकारी अभियंता सुनील पावडे यांचे हस्ते  दिनांक 12 जून 2021 रोजी पार पडले.
बारामती येथे पुणे जिल्ह्यातील जिल्हा स्थरावरील क्रीडा संकुल उभे  आहे.  मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार क्रीडा संकुल बारामती येथे  खेळाडू साठी विविध प्रकारच्या  सुविधा उभारणीचे कामकाज जोरात चालू आहे. यामध्येच एक असलेले  आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन लॉन टेनिस  कोर्ट  चे उद्घाटन  महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनील पावडे यांच्या हस्ते 12 जून 2021 रोजी  पार पडले. खेळाडूंनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे पावडे यांनी यावेळी म्हटले.  हे क्रीडा संकुल  खेळाडू साठी उत्तम दर्जाचे  क्रीडा हब होत आहे ही एक चांगली जमेची बाजू  आहे.  या टेनिस कोर्टचे काम तालुका क्रीडा अधीकारी जगन्नाथ लकडे यांनी  अथक परिश्रमाने  उच्च दर्जाचे काम वेळेत पूर्ण केले. तसेच उपमुख्यमंत्री पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील आणि बारामती बँकेचे चेअरमन अविनाश लगड यांचेही  मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment