बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दुर्गम भागातील विजेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सुटणार* *जिल्हा नियोजन आराखड्यात विषय समाविष्ट करण्यास राज्य शासनाची मंजुरी* *खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दुर्गम भागातील विजेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सुटणार* *जिल्हा नियोजन आराखड्यात विषय समाविष्ट करण्यास राज्य शासनाची मंजुरी* *खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश*

*बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दुर्गम भागातील विजेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सुटणार*
 *जिल्हा नियोजन आराखड्यात विषय समाविष्ट करण्यास राज्य शासनाची मंजुरी* 
 *खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश*
मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) - बारामती लोकसभा मतदारसंघातील मुळशी आणि वेल्हे तालुक्याच्या दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांचा वीजप्रश्न जिल्हा नियोजन आराखड्यात समाविष्ट करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यासाठी नुकतीच १२ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार लागलीच हा विषय प्रधान्यक्रमावर घेण्यात आला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ हा विषय मार्गी लावावा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मतदार संघाच्या दुर्गम भागातील विजप्रश्न तातडीने सुटण्यास मदत होणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील उर्जा विभागाच्या विविध प्रश्नांविषयी खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची गेल्या महिन्यात १० मे रोजी झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती. त्यावेळी मुळशी  आणि वेल्हे तालुक्यातील वाड्या-वस्त्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुळे यांनी १२ कोटी रुपये इतक्या निधीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने हा विषय मंजूर केल्याचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे. खासदार सुळे यांनी यासाठी बारा कोटींची मागणी केली आहे. महावितरणच्या पुणे विभागीय अधीक्षक अभियंता कार्यालयाने लागलीच तसा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाला सादर केला आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन आराखड्यात या विषयाचा समावेश करून तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment