हेमंत मुसरीफ पुणे. यांच्या सुरेख कविता...कृषी दिन व डाॅ दिन शुभेच्छापर कविता.!
कृषी दिन ..
कृषी दिन हा साजरा
नको नावाला केवळ
निमीत्ते बळीराजाच्या
जायचे मनाचे जवळ
घाम गाळी शेतकरी
भरवी आपणां कवळ
कर्जा न्हाहे सात बारा
आणतो कशी भोवळ
क्लिष्ट तम कायद्यात
पिवळी पडे हिरवळ
आंदोलने करण्यातचं
विरली सुगंधी दरवळ
दगा फटका नेहमीचा
पाठीवर उठलेत वळ
हमी भाव देऊ नक्की
जिभा करती वळवळ
नको कागदी शुभेच्छा
आतून यावी तळमळ
कृतज्ञता कृतीत दिसो
भावनाअसावी निर्मळ
- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..
www.kavyakusum.com
2
पिंजरा ..
शोभे पुरता का करता
कृषी दिन हा साजरा
त्याचेसाठी काय केले
हा प्रश्न विचारा जरा
स्वतः साठी मागत ना
रे कधीही तो लाजरा
पोशींदा तो जगताचा
अवस्था त्याची जर्जरा
तो सतत देतचं राहीलं
आटणार नाही निर्झरां
दगडी हृदयास तुमच्यां
फुटणारं केंव्हा पाझरां
हमी भावाची ना हमी
फसणारं नाही गाजरा
रिकामाचं राहणारं तो
रेआश्वासनांचा पिंजरा
बदलणार नाहीआम्ही
स्वभाव तुमचा माजरा
सळो पळो करे किती
घंटा बांधा त्या मांजरा
- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..
www.kavyakusum.com
3
आयुर्वेद ..
महत्त्वाचे चार वेद
तयामुख्य अथर्ववेद
क्लिष्टजरी स्पष्टतरी
जगण्या नवीन उमेद
वैद्यकीय शाखातीन
अमृतकुंभ आयुर्वेद
देवांचं वरदान जणूं
अथर्ववेदाचा उपवेद
श्रेष्ठ तरी शिष्ट नाही
करीत ना भेदा भेद
आम्हीचं करे तुलना
वाढवी विवादसखेद
रोगाचे मुळ शोधूनि
मुळावरती देई छेद
सर्वे संतु निरामय :
मंत्र यंत्र हे आयुर्वेद
-हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.
www.kavyakusum.com
4
धन्वंतरी ..
कोरोना सावट भारी
गोंगावते जगतांवरी
अनाहुत पाहुणे दारी
धड धड सर्वांचे उरी
कार्यालये झाले बंद
काम करी घरचे घरी
समारंभा मिळे सुट्टी
साम सूम रस्त्यावरी
व्हायरस उभा दारी
पाठवा तया माघारी
डाॅक्टर लढे सक्षम
जणूंसैनिक धन्वंतरी
अल्ला ईश्वर ईसाई
डाॅक्टर ते खरोखरी
सलाम सहस्त्र त्यांना
ते उपकृत सर्वां करी
वेगळालिहा इतिहास
किर्ती जाय दिगंतरी
माणसा कळे माणूस
डाॅक्टर वसले अंतरी
- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com
कृषी दिन व डाॅ दिन शुभेच्छा..
No comments:
Post a Comment