*टेक्सटाईल पार्क मधील कर्मचाऱ्यांसाठी योग साधना शिबीर*
योग दिनानिमित्त जीवनविद्या योग आयुर्वेद फौंडेशन चा उपक्रम
बारामती:- आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बारामतीच्या टेक्सटाईल पार्क मधील पेपरमिंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन केले होते.
सुमारे 50 महिला व कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. या मध्ये त्यांना विविध सूक्ष्म व्यायाम, कामाच्या स्वरूपानुसार योगासने , प्राणायाम यांचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात आले. योग महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी त्यांना योगासनांचे प्रात्यक्षिके करून दाखवली.
कामाच्या स्वरूपामुळे सतत पुढे वाकून , उभे राहून काम करणे यामुळे कर्मचाऱ्यांना विविध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते , त्यावर नियमित योग साधना आणि सराव करणे आवश्यक आहे , त्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, त्यासाठी या शिबिराचे आयोजन केले होते. अशी माहिती योग महाविद्यालयाचे संचालक डॉ निलेश महाजन यांनी दिली.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ भक्ती महाजन, शिल्पा खुमकर, स्मिता देवकर, नितु साळुंखे, अण्णा ढमे, नीलम भट, पेपरमिंट कंपनीचे व्यवस्थापक श्री शरद शिंगाडे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment