रस्त्याचे डांबरीकरण करून स्ट्रीट लाईट बसवणेबाबत निवेदन..
जळोची:- येथील चव्हाण इको पार्क मधील
रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता आहे. सध्या पावसाळयाचे दिवस असून, रस्त्यावर जागोजागी खड्डे पडत असल्याने यामध्ये
पावसाचे पाणी साठुन राहते त्यामूळे रस्त्याचा अंदाज येत नसल्यामूळे गाडी ही चिखलामध्ये गुतून बसतात. त्यामूळे अपघात होण्याची शक्यता असते तसेच या स्स्त्यामध्ये स्ट्रीट लाईटची सुविधा नसल्यामुळे, रात्री अपरात्री चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच महिला वर्गास कामानिमीत्त घराबाहेर पडणे व जाणे येन्यास खूप मुश्कील झाली आहे. तरी सदर रस्त्याचे डांबरीकरण होवून त्वरीत स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी असे निवेदन बारामती नगर परिषदेला व नगराध्यक्ष यांना देण्यात आले असल्याचे अस्लम वस्ताद शेख सी.आर.सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य युवक उपाध्यक्ष यांनी माहिती दिली.
No comments:
Post a Comment