विभागीय क्रीडा संकुलास शुरवीर जिवाजी महाले यांचे नाव द्या- नाभिक सेवा संघाची मागणी
=======================
औरंगाबाद(प्रतिनिधी):- प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्राण वाचवुन इतिहासात *होता जिवा म्हणून वाचला शिवा* या महणीने आजरामर झालेले , छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू मावळे शुरवीर जिवाजी महाले यांचे नाव औरंगाबाद येथील विभागीय क्रीडा संकुलास देण्यात यावे असी मागणी नाभिक सेवा संघाच्या वतीने मुख्यमंत्री मा श्री उद्धव ठाकरे यांच्या कडे पत्राद्वारे करण्यात आली. विभागीय क्रीडा संकुलास नाव दिल्यास जिवाजी महाले यांचा इतिहास ऐनार्या पिढीला समजेल तसेच त्यांनी केलेल्या पराक्रमाचा गौरव होईल, म्हणून विभागीय क्रीडा संकुलास शुरवीर जिवाजी महाले विभागीय क्रीडा संकुल असे नामकरण करण्यात यावे .
मुख्यमंत्री यांना पाठवलेले पत्रात नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री माधव भाले, उपाध्यक्ष श्री गणेश वाघमारे, सरचिटणीस श्री सेनाजी काळे, श्री हर्षद शिर्के ,प्रदेश कार्याध्यक्ष श्री विजय अवधुते, आबासाहेब बोरुडे, श्री कृष्णा पंडित, औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष श्री संतोष पवार, जिल्हा अध्यक्ष श्री विजय तोडकर,भारत खटले यांच्या स्वाक्षरी आहेत.
No comments:
Post a Comment